'ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी सज्ज व्हा'; राज ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांना दिले आदेश

By मुकेश चव्हाण | Published: December 14, 2020 04:57 PM2020-12-14T16:57:17+5:302020-12-14T16:57:46+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा या पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

Get ready to contest Gram Panchayat elections; MNS President Raj Thackeray gave orders to the district president | 'ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी सज्ज व्हा'; राज ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांना दिले आदेश

'ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी सज्ज व्हा'; राज ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांना दिले आदेश

Next

मुंबई: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणूका झाल्या. यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनूसार, 15 जानेवारी 2021 ला राज्यातील सर्व ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका पार पडणार आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा या पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच आता या निवडणुकीत मनसे देखील पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायती निवडणुकांसाठी सज्ज व्हा. मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी जाहीर केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचं संकट असल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र नुकत्याच सुरळीत झालेल्या पदवीधर निवडणुकांनंतर ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असून 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम असा-

निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे : 15 डिसेंबर
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत : 23 ते 30 डिसेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी : 31 डिसेंबर
उमेदवारी अर्ज माघार व चिन्ह वाटप : 4 जानेवारी
मतदान : 15 जानेवारी (सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच)
मतमोजणी : 18 जानेवारी
निवडणूक निकालाची अधिसुचना प्रसिद्धी : 21 जानेवारीपर्यंत

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

Web Title: Get ready to contest Gram Panchayat elections; MNS President Raj Thackeray gave orders to the district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.