महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेससाठी सज्ज व्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 03:11 AM2020-06-13T03:11:57+5:302020-06-13T03:12:27+5:30
सुरक्षित असा धावण्याचा मार्ग स्वत: निवडू शकता.
महामॅरेथॉन रेसडायरेक्टर संजय पाटील
या अनिश्चिततेच्या काळातही धावपटूंची सकारात्मकता आणि सामर्थ्य अबाधित होते, याची मला पूर्ण खात्री आहे, आम्ही इतरांना प्रेरणा देण्यासह स्वत:ही प्रेरित राहू शकलो. या प्रेरणेस पाठिंबा देण्यासाठीच 10 हजारांहून अधिक धावपटू या महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेसमध्ये सहभागी होत आहेत.
व्हर्च्युअल रेसमध्ये धावण्यासाठी नियोजन, रणनीती आणि योजनेची गरज असते. या आगामी शर्यतीसाठी तयारी करताना तुम्हाला मदतीचे ठरतील, असे काही मुद्दे मी येथे देत आहे.
योग्य सराव
योजनेवर अंमल करा
शर्यतीत धावत असलेल्या अंतरासाठी योग्य सराव योजना निवडा आणि त्यावर अंमल करा. दररोज कधी आणि किती अंतर धावायचे आहे, हे जाणून घेतल्यास सरावाच्या ट्रॅकवर राहण्यास मदत होईल. हळूहळू तुम्ही धावण्याचे अंतरही वाढवू शकता, यामुळे शरीराची जोखीम कमी होईल.
शर्यतीसाठी ध्येय निश्चित करा
शर्यतीसाठी ध्येय निश्चित करण्याने सरावासाठी प्रेरणा आणि सरावाचा आराखडा ठरवण्यास मदत मिळते. स्मार्ट ध्येय निश्चित करण्याची खात्री करा. तुमचे ध्येय हे विशिष्ट असावे, मोजण्यायोग्य, प्राप्त करता येईल असे सुस्पष्ट आणि वेळेत पूर्ण होणारे असावे.
काही धावपटूंना त्यांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायला आवडते; पण याचा रेस वेळेत पूर्ण होण्याशी संबंध नाही. संपूर्ण अंतर चालण्यासाठी न थांबता धावणे किंवा निगेटिव्ह स्प्लिट ( शर्यतीच्या पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात वेगाने धावणे) यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता.
शर्यतीत तुम्ही तुमचे ध्येय गाठले तर तुमच्या यशाला नक्कीच चार चाँद लागतील आणि तुम्ही हे ध्येय गाठू शकला नाहीत, तरीही आपले ध्येय गाठण्यासाठी अधिकाधिक मेहनत घेण्याची जास्त शर्यतीत भाग घेण्याची प्रेरणा यातून मिळेल.
धावण्याचा मार्ग : तुम्ही तुमचा धावण्याचा सराव आणि व्हर्च्युअल रेस ही कुठे करता, याचा तुमचा सराव आणि मन:स्थिती यावर मोठा परिणाम होत असतो. तुम्हाला एखादे उद्यान किंवा ट्रेलवर चालण्याची इच्छा नसेल तर निसर्गरम्य आणि शांत मार्ग शोधण्यासाठी थोडे जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. तुम्ही तुमच्या घरातच धावण्याचा निर्णय घेतला असेल तर तुमच्या मार्गातील लहानसहान अडथळे दूर करा. म्हणजे तुम्ही धावत असताना मार्गात येणारे टेबल, सोफा थोडा वेळ बाजूला सरकवा. तुमच्या घरातील सर्वात मोठा भाग निवडून त्या मार्गावर धावा. व्हर्च्युअल रेस धावताना तुम्ही तुमचा आवडीचा आणि स्दि. १४ जूून २०२० । सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत
धावण्याचा व्हर्च्युअल साथीदार शोधा
1. धावण्यातील साथीदार म्हणजे केवळ सोबत धावणारे मित्र नाहीत, तर तुम्हाला जे वेळोवेळी नवनवी माहिती देतात, तुम्हाला प्रेरित करतात. आपल्या मित्रांसोबत आपली प्रगती शेअर केल्याने आणखी सराव करण्यास तुम्ही प्रेरित राहता.
2. जर तुमचा एखादा धावपटूंचा ग्रुप नसेल किंवा मित्र नसेल तर तुम्ही व्हर्च्युअल साथीदाराचीही निवड करू शकता. यासाठी तुम्ही स्त्रावा रळफअश्अ सारख्या एखाद्या रनिंग सोशल नेटवर्कचा वापर करू शकता ज्यात तुम्ही वर्कआऊट पोस्ट करू शकता आणि इतर धावपटूंशी संवाद साधू शकता. आमच्या फेसबुक ग्रुप आणि पेजवरही तुम्ही महामॅरेथॉनमधील इतर धावपटूंच्या संपर्कात राहू शकता.
3. तुमच्या व्हर्च्युअल रेससाठी शुभेच्छा. याबाबत आपले काही प्रश्न, अडचणी असतील तर मला १ी’ं७९ीं’128@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेल आय डीवर विचारू शकता. तुमची ही शर्यत अविस्मरणीय बनवण्यासाठी मदत करताना मला निश्चितच आनंदच होईल.
मानसिक सराव आणि सामर्थ्य यावर काम करा
शर्यतीतील ग्रुप इफेक्ट आपल्याला धावण्यास प्रेरित करीत असतो; पण व्हर्च्युअल शर्यतीत प्रेक्षक नाहीत की स्पर्धक नाहीत आणि पेसर्सही नाहीत, येथे असता फक्त तुम्ही आणि तुमचे घड्याळ. अशा वेळी नियमित शर्यतीपेक्षा जास्त मानसिक तयारी आणि सामर्थ्याची गरज असते.
व्हर्च्युअल शर्यतीसाठी धावण्याचा सराव करणे ही मानसिक रणनीती आणि मानसिक कणखरपणा वाढवण्याची उत्तम संधी आहे.
मार्इंड गेम्स, इमेजरी, पॉझिटिव्ह अँफरमेशन्स, व्हिजुअलायजेशन, सेल्फ टॉक यांचा वापर करा. धावण्यात साथीदारांनाही सहभागी व्हायला लावून एकमेकांना आव्हान द्या, हा माझा वैयक्तिक सल्ला आहे. आपले मित्रही आपल्यासोबत धावत आहेत, ही भावना या शर्यतीत पुढे जाण्यास प्रेरित करीत राहील.
- संजय पाटील ( रिलॅक्स - झील) महामॅरेथॉन रेस डायरेक्टर
पुन्हा
एकदा धावा, नव्या उमेदीने
औरंगाबाद : लॉकडाऊन संपल्यानंतर आता पुन्हा एकदा प्रत्येक जण नव्या आशेने, नव्या ध्येयाने भविष्याकडे पाहत आहे. म्हणूनच तर मग 'लोकमत'सोबत पुन्हा एकदा धाव घ्या, नव्या उमेदीने आणि नव्या जिद्दीने. दि. १४ जून रोजी होणाºया या 'लोकमत व्हर्च्युअल रन'मध्ये तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रमंडळींसोबत
सहभागी व्हा.
महामॅरेथॉनच्या माध्यमातून ‘लोकमत’ने नेहमीच फिटनेसला प्राधान्य दिले आहे. एक मुक्त, मोकळा श्वास घेऊन नवी उमेद मिळविण्यासाठी धावा. कारण आरोग्य, फिटनेस आणि उत्साह वाढवूनच तर आजच्या परिस्थितीवर मात करून वेगाने पुढे झेप घेणे शक्य होणार आहे. हा उपक्रम दि. १४ जून रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि तुम्हाला हवे त्या ठिकाणी ३, ५ किंवा १० किलोमीटर धावू शकता. सहभाग नोंदणीसाठी ँ३३स्र://ु्र३.’८/५्र१३४ं’फ४ल्ल येथे नावनोंदणी आवश्यक करा.