लोकलला लटकणाऱ्यांना आळा घाला - हायकोर्ट
By admin | Published: April 29, 2015 01:59 AM2015-04-29T01:59:51+5:302015-04-29T01:59:51+5:30
लोकल रेल्वेच्या दरवाजावर व खिडक्यांवर लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य ती कारवाई करणे आवश्यक
मुंबई : लोकल रेल्वेच्या दरवाजावर व खिडक्यांवर लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य ती कारवाई करणे आवश्यक असून, यासाठी काय नेमके केले जाणार याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने रेल्वेला दिले आहेत.
न्या. नरेश पाटील व न्या. व्ही.एल. अचलीया यांनी हे आदेश दिले आहेत. रेल्वे प्रवाशांसाठी काय घातक आहे, प्रवास करताना काय काळजी घेतली पाहिजे यासह सुरक्षित प्रवासाविषयची माहिती रेल्वेने तिकिटावरच द्यावी. या माहितीचे बॅनर्स फलाटावर लावावेत, अशी सूचना करीत असा उपक्रम राबवला जाणार की नाही याचे प्रत्युत्तर रेल्वेने सादर करावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. हा उपक्रम राबवताना रेल्वेने सामाजिक संघटनेची मदत घ्यावी; तसेच गर्दीच्या वेळी फलाटावर एक सुरक्षारक्षक नेमावा, असेही न्यायालयाने सुचवले आहे. ए.बी. ठक्कर यांनी यासाठी जनहित याचिका केली आहे. (प्रतिनिधी)