मतमोजणीतील तांत्रिक घोळातून सुटका

By admin | Published: February 23, 2017 07:00 AM2017-02-23T07:00:00+5:302017-02-23T07:00:00+5:30

मतमोजणी करताना मशिनमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी

Get rid of the technical collision in the counting of votes | मतमोजणीतील तांत्रिक घोळातून सुटका

मतमोजणीतील तांत्रिक घोळातून सुटका

Next

मुंबई : मतमोजणी करताना मशिनमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आधुनिक ईसीएल तंत्रज्ञानाचा वापर केला  आहे. यासाठी प्रशिक्षण घेतलेले  तंत्रज्ञ प्रत्येक मतमोजणी केंद्रावर  नेमले आहेत. गेल्या मतमोजणीवेळी तांत्रिक घोळ काही ठिकाणी  झाल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. मतदानाचा निकाल गुरुवारी आहे. मतमोजणीवेळी मतदारांनी नोंदवलेल्या मतांची माहिती मशिनवर सतत लोड असते. परिणामी, मशिनमध्ये छोटे-मोठे तांत्रिक बिघाड होऊन काही वेळा मशिन बंद पडतात. याचा रोष येथील कर्मचाऱ्यांवर ओढवतो. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींकडून गोंधळ घालण्याचे प्रकार घडतात.
मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत असे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीत असे प्रकार घडू नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुंबईतील २३ मतमोजणी केंद्रांवर ईसीएल तंत्रज्ञान अवगत असलेले तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात
आली आहे. या तंत्रामुळे मशिनमधील बिघाड तत्काळ दुरुस्त करता  येणार आहे. यामुळे केंद्रावर गोंधळ होण्याचे प्रकारदेखील कमी होण्यास मदत होईल, असे एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Get rid of the technical collision in the counting of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.