राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे बळ मिळो; एकनाथ शिंदेंच्या फडणवीसांना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 08:27 PM2022-07-22T20:27:22+5:302022-07-22T20:30:06+5:30

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Get the strength to take the state to new heights of The Chief Minister of the state Eknath Shinde has wished Deputy Chief Minister Devendra Fadnavi | राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे बळ मिळो; एकनाथ शिंदेंच्या फडणवीसांना शुभेच्छा

राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे बळ मिळो; एकनाथ शिंदेंच्या फडणवीसांना शुभेच्छा

Next

मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांचा आज ५२ वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे बळ मिळो अशा शुभेच्छा त्यांना यासमयी दिल्या, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. "अडथळ्यांची शर्यत पार करत त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत, कायम विकासाचा गोडवा पसरवणारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा," असं ट्वीट त्यांनी केलं आहे. हे ट्वीट करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जिलेबी भरवतानाच फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या काळात सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी भूमिका बजावली. तर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून केली होती. वयाच्या २७व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. देवेंद्र फडणवीस हे अभाविपचे सक्रिय सदस्य होते. तर वयाच्या ४४व्या वर्षी शरद पवार यांच्यानंतर ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. 

Web Title: Get the strength to take the state to new heights of The Chief Minister of the state Eknath Shinde has wished Deputy Chief Minister Devendra Fadnavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.