Join us

एक हजार ते एक कोटींपर्यंतच्या कर्जफेडीसाठी तीन महिने व्याजरहीत सवलत द्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 3:06 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार ते एक कोटींपर्यंतच्या कर्जफेडीसाठी तीन महिने व्याजरहीत सवलत द्या.

 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार ते एक कोटींपर्यंतच्या कर्जफेडीसाठी तीन महिने व्याजरहीत सवलत द्या, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र मनसेच्या वतीने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहले आहे.

याबाबत मनसेचे नेते जयप्रकाश बाविस्कर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी, मजूर यांनी कर्ज घेतले आहे. कर्जदारांचे तीन महिने कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचे आवाहन आरबीआयने बँकांना केले होते. परंतु त्या कालावधीतील हप्त्याचे व्याज वसूल केले जाणार आहे. कामगार, मजूर, शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत.  सध्या जाहीर केलेल्या योजनेत व्याज आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे केवळ पत गुणांकन खराब होऊ नये एव्हढाच दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे व्यवहार ठप्प असल्याने नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देण्याची गरज आहे. मात्र या योजनेमुळे तो दिलासा मिळाला नाही. शेतकरी, मजूर यांना दिलासा मिळाला यासाठी  एक हजार ते एक कोटींपर्यंतचे जे कर्ज आहेत. त्या कर्जाची परतफेड करताना हे तीन महिने व्याजरहीत सवलत द्यावी. याबाबतचे पत्र मनसेच्या वतीने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहले आहे. 

-------------------------------

क्रेडिट कार्ड पेमेंट व्याजरहीत करा

देशातील क्रेडिट कार्डधारकांना तीन महिने पेमेंट करण्याची सवलतही व्याजरहीत असावी.ते व्याज ३६ ते ४० टक्के असते. हा व्याजदर गळ्याला फास आणणाऱ्या सुल्तानशाही प्रमाणे आहे. तसेच कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असून क्रेडिट कार्ड वापरण्याची आर्थिक मर्यादा दुप्पट करण्यात यावी अशी मागणी मनसेचे नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी केली आहे.

 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस