मान्सूनपूर्व कामांना मुहूर्त मिळेना

By admin | Published: May 24, 2014 12:52 AM2014-05-24T00:52:31+5:302014-05-24T00:52:31+5:30

रोहा नगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा अगदी सुसज्जपणे तयार केलेला आहे. सर्व नाले आणि गटारे सफाई पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे.

Getting Pre-Monitored Work | मान्सूनपूर्व कामांना मुहूर्त मिळेना

मान्सूनपूर्व कामांना मुहूर्त मिळेना

Next

रोहा : रोहा नगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा अगदी सुसज्जपणे तयार केलेला आहे. सर्व नाले आणि गटारे सफाई पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. यंदाही नेहमीप्रमाणे पावसाळा तोंडावर आला तरी या सफाईच्या कामांना सुरुवात झालेली नाही. शहरातील सर्वत्र घनकचरा, नाले व गटारे तुंबलेली दिसून येतात. लोकसभा आचारसंहितेमुळे ही कामे मागे राहिल्याचे व १ जूनपर्यंत ती सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सांगितले आहे. येथील कुं डलिका नदीचा पश्चिम भाग हा खाडीला लागूनच असल्याने समुद्राला आलेल्या भरतीदरम्यान धरणातून पाणी सोडले गेल्यास पावसाळ्यात शहरात पाणी शिरण्याची भीती रोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर रोहा नगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मान्सूनपूर्व कामांना अद्याप सुरुवात झालेली नसली तरी ही कामे १ जूनपर्यंत पूर्ण केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ रोहा नगरपालिकेने या काळात अद्ययावत माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. विविध समित्या नेमून त्यांना विविध कामे सोपविण्यात आलेली आहेत. जनसंपर्क व दळणवळणाची साधने तत्पर ठेवण्याबरोबरच पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोणतीही जिवित व वित्त हानी होवू नये या दृष्टीकोनातून नियंत्रण करण्याच्या उद्देशाने आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा पालिकेने बनविलेला आहे. यासोबतच आपत्ती नियोजनासाठी विविध व्यवस्था ही करण्यात येत आहे. त्यामध्ये गावातील पोहण्यात तरबेज असलेल्या युवकांची यादी, वाहतुकीसाठी आवश्यक माहिती, आपत्कालीन साहित्य, साधनसामुग्री जेथून उपलब्ध व पुरवठा केला जाईल या सर्वांची नोंद या आराखड्यात नमूद करण्यात आली आहे. यासह आरोग्य पथकासाठी डॉक्टरांची यादी, विद्युत महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्‍यांची, सेवाभावी संस्था आणि पत्रकारांचीही यादी इ. सर्व प्रकारच्या याद्या, त्यांचे दूरध्वनी क्रमांकासह तयार ठेवण्यात येत असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सांगितले आहे. मान्सूनपूर्व आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा अगदी सुसज्ज असला तरी अद्याप ग्राउंड लेव्हलचे काम करण्यात रोहा नगरपालिका मागे राहिल्याने दिसून येत आहे. जी कामे पावसाळ्यापूर्वी आवश्यक आहे. ती होताना दिसत नाहीत. यामध्ये मान्सून दाखल होण्यापूर्वी शहरातील नागरिकांचे आरोग्य, शहर सौंदर्यीकरण, घनकचरा उचलणे, शहर साफ स्वच्छ करणे आदि कामे मागे पडलेली आहेत.रोहा शहरात मुसळधार पाऊस झाल्यास दमखाडी परिसरात रस्त्यावरून ढोपरभर पाणी वाहू लागते. आणि पूर सदृष्यपरिस्थिती होते. पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी याबाबत माहिती सांगितली की दमखाडीतील नाल्याचा प्रवाह उलट दिशेने वाहतो. शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहिला गेला पाहिजे. पालिकेने नगरोत्थान अभियान अंतर्गत स्टॉर्म वॉटर ड्रेनेजमध्ये दमखाडीतील नाला योग्य दिशेने करण्याचे काम प्रस्तावित आहे. शहरातील इतर नाल्यांचेही मजबुतीकरण, तांत्रिक बाबी लक्षात घेवून उताराच्या दिशेने प्रवाह करणे आदि कामे होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Getting Pre-Monitored Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.