तिकिटाच्या रांगेतून सुटका: मेट्रोच्या प्रवाशांना आता मोबाइल तिकीट मिळणार, प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 03:27 AM2017-11-17T03:27:13+5:302017-11-17T03:27:31+5:30

शहरातील वातानुकूलित आणि प्रभावी वाहन व्यवस्था म्हणून नावाजलेल्या मेट्रोने प्रवाशांसाठी आता मोबाइल तिकिटाचा पर्याय खुला केला आहे.

Getting rid of the ticket row: Now the passengers of the metro will get a mobile ticket, comfort the passengers | तिकिटाच्या रांगेतून सुटका: मेट्रोच्या प्रवाशांना आता मोबाइल तिकीट मिळणार, प्रवाशांना दिलासा

तिकिटाच्या रांगेतून सुटका: मेट्रोच्या प्रवाशांना आता मोबाइल तिकीट मिळणार, प्रवाशांना दिलासा

Next

मुंबई : शहरातील वातानुकूलित आणि प्रभावी वाहन व्यवस्था म्हणून नावाजलेल्या मेट्रोने प्रवाशांसाठी आता मोबाइल तिकिटाचा पर्याय खुला केला आहे. गुरुवारी याबाबतची घोषणा मेट्रोच्या वतीने करण्यात आली. यामुळे तिकीट आणि पासच्या रांगांतून प्रवाशांची सुटका होईल.
‘घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा’ हा मेट्रो मार्ग जगातील सर्वाधिक घनता असलेला मेट्रो मार्ग आहे. एका खासगी मोबाइल व्हॉलेट कंपनीसोबत मुंबई मेट्रोने करार करत मेट्रोच्या प्रवाशांसाठी मोबाइल तिकिटाची सेवा सुरू केली आहे. मोबाइल तिकिटांसाठी एक विशेष अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवरील क्यू आर कोड एएफसी गेटवरील स्कॅनरवर स्कॅन करून प्रवासाला सुरुवात करता येईल. तसेच स्थानकाबाहेरून आपल्या प्रवासी मार्गाचे तिकीट खरेदी करण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे. सध्या ही सुविधा ‘स्किप क्यू’ या अ‍ॅपवर सुरू आहे. या मोबाइल तिकीट सेवेत एकल मार्ग, दुहेरी मार्ग, ट्रिप पास, स्टोअर मूल्य अशा बाबींचा समावेश आहे.
मुंबई मेट्रोच्या अ‍ॅपवर ही सुविधा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच मुंबई मेट्रोच्या अ‍ॅपवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मुंबई मेट्रोच्या प्रवक्त्यांनी दिली.
असा मिळवा ‘कोड’ -
मेट्रो अ‍ॅपवरील लिंकवर क्लिक करा. लिंक ओपन झाल्यावर परचेसिंग पार्टवर क्लिक करा. त्यानंतर प्रवासाचा मार्ग (एकल-दुहेरी) निवडा. प्रवासाचे टप्पे निवडा. तिकिटाचे पैसे अदा करण्यासाठी उपलब्ध आॅप्शनवर क्लिक करा. भाड्याची रक्कम अदा झाल्यावर त्वरित आपल्या मोबाइलवर क्यू आर कोड जनरेट होईल. तो कोड संबंधित स्थानकावर स्कॅन करून प्रवास करता येईल.

Web Title: Getting rid of the ticket row: Now the passengers of the metro will get a mobile ticket, comfort the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.