खोटी माहिती दिल्याने घाटकोपर क्राइम ब्रँचचे अधिकारीही गोत्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 04:48 AM2019-12-17T04:48:54+5:302019-12-17T04:49:46+5:30

साहाय्यकआयुक्तांकडून चौकशी सुरू : चुकीची माहिती देऊन अर्जदारावर दबावाचा प्रयत्न

Ghatkopar Crime Branch Officers Going Investigation | खोटी माहिती दिल्याने घाटकोपर क्राइम ब्रँचचे अधिकारीही गोत्यात!

खोटी माहिती दिल्याने घाटकोपर क्राइम ब्रँचचे अधिकारीही गोत्यात!

Next

जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खार पोलिसांनी फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविलेल्या म्हाडातील उप विकास अधिकारी युवराज सावंत यांच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा अन्वेषण शाखेच्या घाटकोपर कक्ष-७ च्या पोलिसांनी तपास अधिकाऱ्याला अनधिकृतपणे तपास प्रकरणाची टिप्पणी पुरविली. त्याचबरोबर तक्रारदाराला अधिकाऱ्यांनीही खोटी माहिती पुरविल्याचे माहिती अधिकार कायद्यातून मिळालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खोटी माहिती देऊन अर्जदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रभारी निरीक्षक सतीश तावरे, निरीक्षक श्रीवधनकर यांची चौकशी साहाय्यक आयुक्त शेखर तोरे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.


क्राइम बॅँ्रचकडून अनधिकृतपणे मिळविलेल्या एका कागदावरील टिपण साहाय्यक निरीक्षक किशोर पवार यांनी अप्पर आयुक्त मनोज कुमार शर्मा यांना युवराज सावंत यांच्याविरुद्धचा पुरावा म्हणून दाखविला होता. मात्र साहाय्यक आयुक्त भूषण राणे यांच्याकडे झालेल्या चौकशीत त्यांनी त्याबाबत अवाक्षरही काढले नसल्याचे ‘आरटीआय’तून मिळविलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
खार पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी म्हाडाचा ठेकेदार युवराज सावंत-पाटील याच्याशी नामसाधर्म्य असल्याने आपल्याला अडकविण्याची भीती असल्यामुळे युवराज सावंत यांनी २ फेबु्रवारी २०१७ मध्ये गुन्हा अन्वेषण शााखेचे तत्कालीन सहआयुक्त संजय सक्सेना यांच्याकडे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी अर्ज दिला होता. त्यांनी त्याबाबत घाटकोपरच्या पथकाला तपास करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते.


मात्र अधिकाºयांनी त्यात विलंब करीत सक्सेना यांची बदली होईपर्यंत अहवाल सादर केला नाही. दरम्यानच्या काळात खार पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक पवार यांनी पूर्वीच्या अधिकाºयांनी केलेला तपास व त्यातील शेºयांकडे दुर्लक्ष करीत वरिष्ठ अधिकाºयांची परवानगी न घेता सावंत यांना गेल्या वर्षी १९ डिसेंबरला अटक केली.
त्यातून दोन महिन्यांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर सावंत यांनी अन्यायी कारवाईबाबत पाठपुरावा केला असताना त्याबाबत १२ जुलैला अप्पर आयुक्त मनोजकुमार शर्मा यांच्याकडे चौकशी करण्यात आली.


त्या वेळी खार पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी गोपाळे, साहाय्यक निरीक्षक पवार यांना बोलाविले असताना त्यांनी युवराज सावंत हेच युवराज सावंत-पाटील असल्याचे पटवून देण्यासाठी घाटकोपर क्राइम युनिटकडील एक टिप्पणी सादर केली होती. वास्तविक, सावंत यांनीच त्याची चौकशीची मागणी करूनही त्याच्या तपासाबाबत काहीही कळविण्यात आलेले नव्हते.
त्यामुळे त्यांनी ‘आरटीआय’तर्फे त्याबाबत मागणी केली असता प्रभारी निरीक्षक सतीश तावरे यांनी त्याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यास नकार दिला. शिवाय घाटकोपरमध्ये दाखल गुन्हा क्र. ७/१७ च्या चौकशीसाठी बोलावूनही हजर राहिले नसल्याचे नमूद केले. या माहितीविरुद्ध सावंत यांनी उपायुक्त अकबर पठाण यांच्याकडे प्रथम अपील केले.


त्यांनी संबंधित माहिती देण्याचे आदेश दिल्यानंतर सावंत यांना २ फेबु्रवारी २०१७ रोजी दिलेला तक्रार अर्ज तपास करून दप्तरी दाखल केला असून त्यासंबंधी साहाय्यक निरीक्षक पवार यांना किंवा खार पोलिसांकडे कोणताही अहवाल पाठविलेला नाही. त्याचप्रमाणे गुन्हा क्र. ७/१७ मध्ये आपला कसलाही संबंध नसल्याचे लेखी कळविले. त्यामुळे घाटकोपर क्राइम बॅँचच्या अधिकाºयांनी सुरुवातीला ‘आरटीआय’अंतर्गत खोटी माहिती दिली,
त्याचप्रमाणे अर्जदार सावंत यांची अन्य गुन्ह्यात चौकशी करावयाची असल्याचे सांगून दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्या या गैरकृत्याबाबत साहाय्यक आयुक्त तोरे यांना चौकशी करण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत. याबाबत सावंत यांचा जबाब नोंदविला असला तरी संबंधित अधिकाºयांकडील चौकशी अद्याप प्रलंबित आहे.

सहाय्यक निरीक्षक पवाराकडून सर्व नियमाची पायमल्ली
पाच वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात कोणताही सबळ पुरावा नसताना सहाय्यक निरीक्षक किशोर पवार यांनी सर्व आवश्यक बाबी धाब्यावर बसवित युवराज सावंत यांना अटक केली. वास्तविक पुर्वीच्या वरिष्ठांनी क्लिन चिट दिली असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याबरोबरच न्यायालयात दाखल आरोपपत्रही मागवून घेतली नाहीत. तसेच त्यांच्याकडे त्या गुन्ह्याचा तपास नसतानाही तो स्वत:कडे वर्ग करुन घेण्याची तसदी घेतली. त्याचप्रमाणे एखाद्या पाहिजे आरोपीला अटक करण्यापूर्वी उपायुक्तांची लेखी संमती घेणे आवश्यक असताना पवार यांनी स्वत:च्या अधिकारात निर्णय घेतला. उपरोक्त बाबींची पूर्ततेसाठी विलंब लागेल, म्हणून त्या गोष्टी पाळल्या नसल्याची कबुली सहाय्यक आयुक्त राणे यांनी केलेल्या चौकशीत दिली आहे.

तपास अधिकाºयांची नार्को टेस्ट करा
चेंबूरमधील महालक्ष्मी को-आॅपरेटिव्ह सोसायटीमध्ये अध्यक्ष व विकासकांनी शासनाची ८० कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आणल्याने संबंधितांनी खार पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे, साहाय्यक निरीक्षक किशोर पवार आणि क्राइम ब्रँचच्या कक्ष-७ चे निरीक्षक सतीश तावरे, श्रीधनकर व इतरांनी संगनमताने कट करून आपल्याला खोट्या गुन्ह्यात फसविले. या सर्वांसह माझीही नार्को टेस्ट करावी, त्यांचे वर्षभराचे सीडीआर तपासावेत, त्यातून सर्व सत्य उघडकीस येईल. मी दोषी आढळल्यास मला फासावर लटकवा; मात्र गैरकृत्य करणाºया या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
- युवराज सावंत, अर्जदार व उप समाज विकास अधिकारी, म्हाडा


गैरकृत्य केलेल्यावर कारवाई करणार
या प्रकरणाचा सविस्तर अहवाल आपण वरिष्ठ अधिकाºयांकडून मागविला आहे. खार पोलिसांनी पदाचा गैरवापर करीत कारवाई केली असल्यास तसेच घाटकोपर गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-७ मधील अधिकाºयांकडून त्यांना साथ दिल्याचे तपासातून स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.

- संजय बर्वे, पोलीस आयुक्त, मुंबई

Web Title: Ghatkopar Crime Branch Officers Going Investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.