Join us

ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 11:17 AM

Bhavesh Bhinde : घाटकोप होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.

Ghatkopar hoarding collapse: घाटकोपरच्या पंतनगरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघाताला तीन दिवस उलटल्यानंतर या प्रकरणातील आरोपी भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. ५०० टनांच्या बेकायदेशीर  होर्डिंगमुळे १६ जणांना मृत्यू झाला आहे. तेव्हापासून भावेश भिंडे हा फरार झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने राजस्थानच्या उदयपूर येथून भावेश भिंडे याला अटक करण्यात आली. मात्र भावेश भिंडेला अटक कशी झाली याबाबतची माहिती पुढे आली आहे.

घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भावेश भिंडेला मुंबई गुन्हेच्या पथकाने अटक केली. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून ७५ जण जखमी झाले आहेत. भिंडे याच्या कंपनीने उभारलेले १२० बाय १२० फुटांचे होर्डिंग पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे कोसळले होते. भावेश भिंडेला (५१) मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या उदयपूरमधून अटक करण्यात आली. अटकेनंतर विमानाने भावेश भिंडेला मुंबईत आणण्यात आले. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यानंतर मुख्य आरोपी भावेश भिंडे फरार झाला होता. उदयपूरमध्ये भिंडे हा ओळख लपवून राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिंडे हा गुरुवारी हॉटेलमध्ये थांबवल्यानंतर शुक्रवारी सकाळी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार केला होता. होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी भिंडेविरुद्ध ३०४, ३३७, ३३८ या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर लगेचच शहरातून पळून गेलेल्या भिंडेला शोधून त्याला पकडण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. अखेर तीन दिवसांनी भिंडेला राजस्थातून पकडण्यात आलं.

कशी झाली अटक?

होर्डिंग कोसळल्यानंतर भिंडे लोणावळ्यापर्यंत रस्त्याने गेला होता. त्यानंतर तो ठाण्याकडे परतला आणि नंतर अहमदाबाद आणि उदयपूरला गेला. तिथे त्याने भाच्याच्या नावाने हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. गुन्हे शाखेने त्याचा माग काढला आणि अखेरीस गुरुवारी संध्याकाळी त्याला ज्या हॉटेलमध्ये सकाळी तपास केला तिथेच पकडले.

कोण आहे भावेश भिंडे?

भिंडेवर कार्यालयात काम करणाऱ्या एका महिलेने आरोप केल्यानंतर जानेवारी महिन्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलुंड पोलिसांनी त्याला अटक करण्याचा आपला हेतू नसल्याची माहिती न्यायालयाला दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला. याशिवाय, २०१६ मध्ये त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिंडेने २००९ मध्ये मुलुंड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीसघाटकोपर