Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 08:30 PM2024-05-13T20:30:42+5:302024-05-13T20:33:57+5:30
Ghatkopar Hoarding Collapse: बीएमसीकडून रेल्वे आणि जाहिरात कंपनी इगो मीडिया विरोधात तक्रार दाखल केली जाणार
Ghatkopar Hoarding Collapse Update : मुंबईतीलघाटकोपरमध्ये लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. या दुर्घटनेत एकूण ६६ जण जखमी झाले आहेत. तर ढिगाऱ्याखाली अजूनही २० ते ३० लोक अडकले असण्याची भीती आहे, अशी माहितीही गगराणी यांनी दिली.
#घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; २० ते ३० जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता- भूषण गगराणी, मुंबई पालिका आयुक्त#GhatkoparHoardingCollapse#Update#Mumbai#BMCpic.twitter.com/lDbIxu7Ir0
— Lokmat (@lokmat) May 13, 2024
घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून जखमींवर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत प्रथमदर्शनी १०० हून अधिक ढिगाऱ्याखाली आल्याचे समजले होते. त्यानंतर ढिगाऱ्याखालून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू झाले असून आतापर्यंत जवळपास ७०हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी करून माहिती घेतली. घडलेल्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जात आहेत.
#WATCH | Ghatkopar hoarding collapse incident | Maharashtra CM Eknath Shinde says, "...Rescuing the people is our priority. Government will take care of the treatment of those who are injured in the incident. Rs 5 lakh will be given to the family of those who have lost their… pic.twitter.com/uMPQjJLQ90
— ANI (@ANI) May 13, 2024
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
घाटकोपर दुर्घटनेच्या ठिकाणी संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जाणार आहेत. याशिवाय मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घाटकोपर प्रकरणातील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यासह मुंबईतील ऑडिट करून अनधिकृत होर्डिंग कापून टाकण्याचे आणि अशा होर्डिंग संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी शिंदे यांनी माहिती दिली.
🏹 Live |📍मुंबई 🔸 13-05-2024
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 13, 2024
पत्रकारांशी संवाद https://t.co/N2G4Oc4jud
मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे म्हणणे काय?
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटने प्रकरणी बीएमसीकडून रेल्वे आणि जाहिरात कंपनी इगो मीडिया विरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत FIR नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
फडणवीस काय म्हणाले?
होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट लिहीत प्रशासनाला उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं आहे. "घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४७ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलीस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.