Join us

2002 घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरण; आरोपी इरफान कुरेशी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 5:30 PM

गुजरात एटीएसने कारवाई करत औरंगाबादमधून इरफानला अटक केली.

मुंबई- 2002 सालच्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इरफान कुरेशीला अटक करण्यात आलं आहे. गुजरात एटीएसने कारवाई करत औरंगाबादमधून इरफानला अटक केली. इरफानला महाराष्ट्र एटीएसकडे सोपवलं गेलं आहे. २००२ साली घाटकोपर पश्चिम येथे एका बसमध्ये स्फोट झाला होता. त्यात ४ जण ठार आणि ३२ जण जखमी झाले होते.

घाटकोपर येथे २ डिसेंबर २००२ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या बेस्ट बस डेपोतील बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये जवळपास 32 नागरिक, महिला, मुले जखमी झाली होती. या बॉम्बस्फोटामुळे बेस्टसह सार्वजनिक मालमत्तेचे जवळपास ५ लाख ३३ हजार ६५० रुपयांचे नुकसान झालं होतं. 

या गुह्यातील ९ जण अजूनही फरार असून त्याचा शोध घेतला जातो आहे. तब्बल १६ वर्षांपासून या गुह्याचा तपास सुरू असून इरफान कुरेशी (४७), रा. शहा कॉलनी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.