शेतक-यांच्या मुलांसाठी धावला ‘घोडपदेवचा राजा’, आत्महत्याग्रस्त शेतक-यांची मुलांना शैक्षणिक साहित्य व शिधा स्वरूपात मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 03:57 AM2017-08-28T03:57:23+5:302017-08-28T03:57:32+5:30

गिरणगावच्या भायखळा विभागातील घोडपदेव परिसरात असलेल्या ‘घोडपदेवचा राजा’ मंडळाने, यंदा आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांच्या संगोपनाचा वसा हाती घेतला आहे.

'Ghodapdevcha Raja' for children of farmers' children, help in the form of education and ration to children of suicidal farmers | शेतक-यांच्या मुलांसाठी धावला ‘घोडपदेवचा राजा’, आत्महत्याग्रस्त शेतक-यांची मुलांना शैक्षणिक साहित्य व शिधा स्वरूपात मदत

शेतक-यांच्या मुलांसाठी धावला ‘घोडपदेवचा राजा’, आत्महत्याग्रस्त शेतक-यांची मुलांना शैक्षणिक साहित्य व शिधा स्वरूपात मदत

Next

मुंबई : गिरणगावच्या भायखळा विभागातील घोडपदेव परिसरात असलेल्या ‘घोडपदेवचा राजा’ मंडळाने, यंदा आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांच्या संगोपनाचा वसा हाती घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांचे संगोपन करणाºया नाशिकच्या आधारतीर्थ आश्रमातील मुलांसाठी, शैक्षणिक साहित्य आणि शिधा उपलब्ध करण्याचा उपक्रम मंडळाने सुरू केला आहे.
मंडळाचे चेअरमन विठ्ठल मयेकर यांनी सांगितले की, ‘कोणतेही शासकीय अनुदान नसल्याने, आधारतीर्थ आश्रमात असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या ३५० मुलांसह ८ विधवांची परवड होत आहे. त्यांना मदत करण्याचा निर्धार घोडपदेव सार्वजनिक मंडळाने केला. मंडळाच्या पदाधिकाºयांनी या विद्यार्थ्यांना अन्नधान्य आणि शैक्षणिक साहित्य पुरविण्याचा निश्चयही केला.’ दरम्यान, आर्थिक चणचण असतानाही मंडळाने सामाजिक कार्यकर्त्यांसह विभागातील नागरिक आणि इतर गणेशोत्सव मंडळांनाही मदतीसाठी आवाहन केले. संबंधित आश्रमात मराठा समाजाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने असल्याने, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनाही संपर्क साधण्यात आल्याचेही मयेकर यांनी सांगितले.
मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, काळाचौकीचा महागणपती मंडळाने संबंधित विद्यार्थ्यांना डिज्नीलँडच्या प्रतिकृतीची सफर घडविण्याचे ठरविल्याचे मंडळाचे सल्लागार विलास गुढेकर यांनी सांगितले. गुढेकर म्हणाले की, ‘घोडपदेवच्या राजाच्या उपक्रमात खारीचा वाटा उचलण्याचे काळाचौकीचा महागणपतीनेही आश्वासित केले. याशिवाय मराठा क्रांती मोर्चा मुंबईचे समन्वयक वीरेंद्र पवार, नवी मुंबईचे समन्वयक विनोद पोखरकर यांनीही उपक्रमात सामील होत, शैक्षणिक साहित्य आणि शिधा स्वरूपात मदत करण्याचे जाहीर केले आहे. विभागातील व्यापारी आणि विकासक मंडळींनीही मदतीचे आश्वासन दिले आहे. सोबतच येथील जय कापरेश्वर ग्रुप, युवा ऊर्जा फाउंडेशन आणि इतर युवकांच्या संस्था व संघटनांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.’ परिणामी, खारीच्या वाट्यातून आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या पाल्यांसाठी छोटीशी मदत उभी राहिली आहे.

‘लोकमत’च्या वृत्तातून उभी राहिली चळवळ
नाशिकमधील आधारतीर्थ आश्रमातील विद्यार्थ्यांची
परवड ‘लोकमत’ने मांडली होती. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत, मंडळाने हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाचे रूपांतर आता लोकचळवळीत होत असून, त्याचा थेट फायदा आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या पाल्यांच्या संगोपनात होणार आहे.

मोफत आरोग्य शिबिर
घोडपदेव सार्वजनिक मंडळाने एका रुग्णालयाच्या सहकार्याने रविवारी येथील कामगार कल्याण केंद्रामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी शेकडो भाविकांनी बीएमडी, बीसीए या तपासण्यांचा मोफत लाभ घेतला.

Web Title: 'Ghodapdevcha Raja' for children of farmers' children, help in the form of education and ration to children of suicidal farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.