- मनोहर कुंभेजकरमुंबई : घोळ माशाच्या बोथासला बाजारात मोठी मागणी आहे. या बोथासचा उपयोग शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या टाक्यांचे धागे निर्मितीसाठी प्रामुख्याने होतो. तसेच औषधनिर्मिती आणि सौंदर्य प्रसाधनांतही या माशाच्या बोथासचा वापर केला जातो. त्यामुळे या माशाचे बोथास तीन ते पाच लाखांपर्यंत विकले जाते. हा मासा ज्या कोळ्याच्या जाळ्यात अडकला त्याला लॉटरीच लागली म्हणून समजा, अशी माहिती रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. स्वप्नजा आशिष मोहिते यांनी दिली.मुख्यत्वे पालघर जिल्ह्यात घोळ मासे मोठ्या प्रमाणात आढळतात. हा मासा क्रोकर म्हणजे सायानिडी कुळातील माशांत मोडतो. या माशांच्या अन्नमार्गाला एक हवेची पिशवी (बोथास) म्हणजे एअर ब्लॅडर जोडलेले असते. या पिशवीचा आकार गाजरासारखा असतो. या अतिरिक्त श्वसनाच्या अवयवामुळे पाण्याबाहेरही हवा घेऊन ती या पिशवीत साठवता येते. तसेच ही हवा साठवलेली पिशवी माशाला पाण्यात वर किंवा खाली तरंगण्यास मदत करते. या पिशवीच्या मदतीने हे मासे काही आवाजही काढू शकतात.‘फिश माँ’ म्हणूनही या पिशव्या ओळखल्या जातात. घोळ माशाच्या नरांना असणाºया या पिशव्या माद्यांच्या पिशवींपेक्षा जास्त दर्जेदार असतात आणि त्यांना चांगला दर मिळतो. प्रथिनांचा स्रोत म्हणून या पिशव्यांना चायनीज मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. पारंपरिक शक्तिवर्धक औषध म्हणून याचा उपयोग पुरातन काळापासून आशिया खंडात केला जातो.बीअर आणि वाइन बनविण्यासाठीही वापरया हवेच्या पिशव्यांचा दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे आयिसंग्लास. बीअर किंवा वाइन बनविण्याच्या प्रक्रि येतील शेवटचा टप्पा आयिसंग्लास वापरल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यातील सूक्ष्म कण काढून बीअर किंवा वाइन क्रिस्टल क्लियर करण्यासाठी घोळ माशाच्या सुकविलेल्या हवेच्या पिशव्या वापरल्या जातात.कोलॅजेनने बनलेल्या या पिशव्यांचे धागे बीअर किंवा वाइनमध्ये भिजून अतिशय बारीक आसांची जाळी तयार करतात. त्यात बीअर किंवा वाइन बनविण्यासाठी फेरमेंटेशन प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या यीस्टचे अतिसूक्ष्म कण अडकून पडतात. ते वेगळे केले की क्रि स्टल क्लियर बीअर किंवा वाइन मिळते.
घोळ मासा म्हणजे मच्छीमारांना लागलेली लॉटरी, बोथासला मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 3:22 AM