मुंबई - मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या चरणी एका भाविकाने पहिल्याच दिवशी डोळे पांढरे करणारी भेटवस्तू अर्पण केली आहे. लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक दूरवरून येतात आणि दरवर्षी वेगवेगळ्या भेटवस्तू गणेशभक्तांकडून राजाच्या चरणी अर्पण केल्या जातात. यंदा देखील गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राजाला एका भाविकाने चक्क सोन्याची ताट, वाट्या, चमचे आणि ग्लास भेटवस्तू अर्पण केली आहे. या भेटवस्तूही किंमत ४७ लाख इतकी आहे. भाविकाने राजाला नेवैद्य अर्पण करण्यासाठी १ किलो २३७ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटचे १ सोन्याचे ताट, दोन वाट्या, एक ग्लास आणि दोन चमचे अशी अनोखी आणि किंमती भेटवस्तू दिली आहे. तसेच अमेरिकन डॉलर, चांदीचे मोदक आणि सोन्या - चांदीचे अनेक दाग - दागिने राजाच्या दरबारात पहिल्याच दिवशी भाविकांनी अर्पण केल्या आहेत.
लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा हे 86 वं वर्ष आहे. लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी येणारे भाविक मुंबईसह महाराष्ट्राबाहेरील असतात. या वर्षी राजाच्या सभोवताली चांद्रयान दोनचा देखावा साकरण्यात आला आहे.