Join us

भारतीयांच्या ‘लास वेगास’ भेटी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 2:43 AM

दरवर्षी अमेरिकेतील लास वेगास या शहराला भेट देणा-या भारतीयांची संख्या वाढत आहे. भारतीयांच्या आवडत्या डेस्टिनेशन्समध्ये लास वेगास शहरदेखील आता समाविष्ट झाले आहे, अशी माहिती लास वेगास कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड व्हिजिटर्स अ‍ॅथोरिटीच्या (एलव्हीसीव्हीए) कम्युनिकेशन मॅनेजर केला पीटरसन यांनी दिली.

मुंबई : दरवर्षी अमेरिकेतील लास वेगास या शहराला भेट देणा-या भारतीयांची संख्या वाढत आहे. भारतीयांच्या आवडत्या डेस्टिनेशन्समध्ये लास वेगास शहरदेखील आता समाविष्ट झाले आहे, अशी माहिती लास वेगास कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड व्हिजिटर्स अ‍ॅथोरिटीच्या (एलव्हीसीव्हीए) कम्युनिकेशन मॅनेजर केला पीटरसन यांनी दिली. पीटरसन सध्या मुंबई दौ-यावर असून, सोमवारी त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.एलव्हीसीव्हीएच्या सर्वेक्षणानुसार लास वेगास हे अमेरिकेतील पर्यटनाच्या दृष्टीने सर्वाधिक पसंती असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत या शहराला भेट देणा-या भारतीयांची संख्या वाढली आहे. भारतासोबतच चीन, जपान, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण कोरिया या देशांमधील नागरिकही लास वेगासकडे आकर्षित होत आहेत. पर्यटकांसाठी लास वेगासमध्ये सध्या १ लाख ५० हजार हॉटेल रूम्सची व्यवस्था आहे.पीटरसन म्हणाल्या की, लास वेगासला भेट देणाºया देशनिहाय पर्यटकांच्या संख्येनुसार भारत सध्या १२ व्या स्थानी आहे. २०१२ पूर्वी भारत पहिल्या २५ देशांच्या यादीतही नव्हता. परंतु गेल्या चार-पाच वर्षांमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात लास वेगासला भेट देत आहेत. तेथील सुविधा, हॉटेल्स, पर्यटनस्थळे भारतीयांना आकर्षित करण्यात यशस्वी झाली आहेत. तेथील पर्यटन विभागाने भारतीयांची मने जिंकली आहेत. तसेच भारतीयांसह जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येत्या काळात खासगी क्षेत्रातून १ हजार ४०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे.>बॉलीवूडमुळे भुरळभारतीयांना लास वेगासकडे आकर्षित करण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक सिनेमे कारणीभूत ठरले आहेत. हल्ली अनेक भारतीय सिनेमांचे लास वेगासमध्ये चित्रीकरण केले जाते. लास वेगासमधील व्यवस्थादेखील बॉलीवूडसाठी अनुकूल आहे. शिवाय बॉलीवूडचा भारतीयांवर असलेला प्रभाव भारतीयांना लास वेगासकडे आकर्षित करत आहे.