गतिमंद प्रणय सर्वोत्कृष्ट कर्मचारी
By admin | Published: November 26, 2014 12:26 AM2014-11-26T00:26:12+5:302014-11-26T00:26:12+5:30
गतिमंद असल्यानंतरही प्रचंड मनोबलाच्या आधारे उत्कृष्ट काम करून अंधेरीच्या प्रणय बुरडेने (26) राष्ट्रपती पुरस्कार मिळवला आहे.
Next
मनोहर कुंभेजकर ल्ल मुंबई
गतिमंद असल्यानंतरही प्रचंड मनोबलाच्या आधारे उत्कृष्ट काम करून अंधेरीच्या प्रणय बुरडेने (26) राष्ट्रपती पुरस्कार मिळवला आहे. एक वर्षाचा असल्यापासून डाऊन सिंड्रोमग्रस्त असलेल्या गतिमंद प्रणयला येत्या 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून गतिमंद पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने गौरव होणार आहे.
या पुरस्काराने मी खूश झालो असून मला आणि माङया टीमला अजून अनेक पुरस्कार मिळवायचे असल्याचे मत प्रणयने व्यक्त केले. यंदा जागतिक डाऊन्स सिंड्रोम्स दिनी इंग्लंडमधील डाऊन सिंड्रोम या जागतिक संघटनेने त्याचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. 2क्क्2 मध्ये गतिमंद मुलांसाठी आयोजित राष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेत त्याला रोलर स्केटिंग खेळात सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक मिळाले होते.
प्रणव हा एक पंचतारांकित हॉटेलमधील हाऊस कीपिंग विभागात गेली सात वर्षे काम करीत आहे. आपल्या सहकारी कर्मचारीवर्गाबरोबर त्याने उत्कृष्ट संभाषण कला देखील अवगत केली आहे. आपल्या गतिमंद सहका:यांनी कसे धीटपणो बोलून आपल्या समस्या-मागण्या मांडल्या पाहिजेत, यावर तो व्याख्यान देखील देतो.
निष्ठेने त्याने केलेल्या कामाचा हा मोठा सन्मान असल्याची भावना प्रणयची आई प्रसुना यांनी व्यक्त केली. प्रणय पायावर उभा राहून धीट झाला पाहिजे, म्हणून वयाच्या 1क्व्या वर्षापासून आम्ही शाळेत त्याला एकटा बसने पाठवत असू. प्रणयला मिळालेल्या पुरस्काराने आपल्याला आणि आमच्या कुटुंबाला खूपच आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.