आजपासून दोन दिवस गर्डर लाँचिंग; रेल्वे वाहतूक होणार विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 09:24 IST2024-12-21T09:24:37+5:302024-12-21T09:24:41+5:30

काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

girder launching for two days from today rail traffic will be disrupted | आजपासून दोन दिवस गर्डर लाँचिंग; रेल्वे वाहतूक होणार विस्कळीत

आजपासून दोन दिवस गर्डर लाँचिंग; रेल्वे वाहतूक होणार विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विविध पुलांच्या गर्डर लाँचिंगसाठी शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही मेल/ एक्स्प्रेसचे मार्ग बदलले जाणार असून काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

असा असेल ब्लॉक आणि गर्डर लाँचिंग कामे

- शनिवारी मध्यरात्री १:०० ते रविवारी पहाटे ४:३०

- ठाकुर्ली आणि कल्याण स्टेशन दरम्यान तिसरा पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी)

- उल्हासनगरमध्ये १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज

- कल्याण आणि अंबरनाथ दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेटऐवजी ओव्हर ब्रिज

-नेरळमध्ये ६ मीटर रुंद फ्लायओव्हर

- रविवारी मध्यरात्री २:०० ते सोमवारी पहाटे ५:३० पर्यंत

- ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान तिसरा नवीन पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिज

विविध अभियांत्रिकी कामे

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी, सिग्नालिंग आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी ९:३४ ते दुपारी ३:४०-  ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान - जलद लोकल डाऊन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर या लोकल थांबतील. तसेच  मेल-एक्स्प्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळविल्या जातील.

ट्रान्स हार्बरवर कसा फटका बसणार?

सकाळी १०.३५ ते दुपारी ४.१०- ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान - सर्व सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे वाहतुकीत काय बदल?

शनिवारी मध्य रात्री १२:३० ते रविवारी पहाटे ४ - भाईंदर आणि वसई रोड स्थानकादरम्यान- काही गाड्या रद्द होतील. धिम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील.


 

Web Title: girder launching for two days from today rail traffic will be disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे