गिरगाव चौपाटीवर वाहतूककोंडी कायम

By admin | Published: March 5, 2016 02:26 AM2016-03-05T02:26:47+5:302016-03-05T02:26:47+5:30

दक्षिण मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असलेल्या गिरगाव चौपाटीवरील वाहतूक गेल्या दहा दिवसांपासून विस्कळीत झाली आहे

Girgaum Chowpatty turned traffic drivers | गिरगाव चौपाटीवर वाहतूककोंडी कायम

गिरगाव चौपाटीवर वाहतूककोंडी कायम

Next

मुंबई : दक्षिण मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असलेल्या गिरगाव चौपाटीवरील वाहतूक गेल्या दहा दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी पालिकेने खोदकाम केले असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनांच्या प्रचंड रांगा सध्या परिसरात लागल्याचे दिसून येत आहे.
गिरगाव चौपाटी ते मफतलाल मार्गावरील दक्षिणेच्या बाजूला दहा दिवसांपूर्वी पालिकेने खोदकाम केले आहे. मात्र, त्याची अद्याप पूर्तता केलेली नाही. त्यामुळे रस्त्याचा निम्मा भाग नाहक अडला गेला आहे. त्यामुळे सकाळी दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांची व संध्याकाळी कार्यालय सुटल्यानंतर परत जाताना या मार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. वाहतूक पोलिसांशी वारंवार खटके उडण्याचेही प्रकार येथे होत आहेत.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालून तातडीने कामाची पूर्तता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Girgaum Chowpatty turned traffic drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.