Join us

गिरगाव ते उपनगर...व्हाया गिरणगाव! गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 1:45 AM

सध्या राज्यातच नव्हे, तर देशात आणि परदेशातही गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. ट्रेन, विमान आणि मिळेल त्या गाडीने चाकरमान्यांसोबत बाप्पानेही मजल-दरमजल करत परदेशापर्यंत उडी मारली आहे.

- चेतन ननावरेसध्या राज्यातच नव्हे, तर देशात आणि परदेशातही गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. ट्रेन, विमान आणि मिळेल त्या गाडीने चाकरमान्यांसोबत बाप्पानेही मजल-दरमजल करत परदेशापर्यंत उडी मारली आहे. त्यामुळे गिरगावापासून गिरणगावापर्यंत आणि गिरणगावापासून उपनगरापर्यंत वाढलेल्या मुंबापुरीतील गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलले आहे.वाढत्या मुंबापुरीने गणेश मंडळांच्या आणि घरगुती गणपतींच्या संख्येतही हजारोंनी वाढ केली आहे. त्यामुळेच गणेश चतुर्थीला मंडपात विराजमान होणा-या बाप्पाच्या आगमन सोहळ्यांना गेल्या १५ दिवसांपासून सुरुवात झाली आहे. तर कोकणासह राज्यभर धाव घेणाºया चाकरमान्यांमुळे एसटीच काय, खासगी वाहनांचे बुकिंगही हाऊसफुल्ल झाले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लोकांना एकत्रित आणण्यासाठी सुरू केलेल्या या उत्सवाचा हेतू काही मंडळे आजही प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न करत आहेत. गिरणगावातील भायखळा, लालबाग, परळ, काळाचौकी परिसरातील मंडळे आजही सामाजिक विषयांवर भाष्य करणारे देखावे आणि चलचित्रांच्या माध्यमातून भक्तांच्या डोळ्यांत अंजन घालत आहेत. तर वर्षभर आरोग्य शिबिर, आदिवासी पाड्यांत शैक्षणिक आणि आर्थिक मदत, ग्रंथालय, अभ्यासिका असे विविध उपक्रम चालवले जातात. गतवर्षी दुष्काळग्रस्त भागांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उभारणीचे काम गणोशोत्सव मंडळांनी केल्याचे विसरता येणार नाही.बदलत्या मुंबापुरीसोबत येथील उत्सवानेही कात टाकल्याचे मान्य करायलाच लागेल. मंडळांच्या एकूण खर्चाच्या तुलनेत सामाजिक उपक्रमांसाठी होणारी रक्कम तोकडी आहे. मंडळे आता लोकवर्गणीऐवजी जाहिरात आणि स्पॉन्सरर्सवर अधिक विसंबून आहेत. पारंपरिक सुगम संगीताची जागा डीजेवर लागणाºया गाण्यांनी घेतली आहे. आगमनच नव्हे, तर विसर्जन मिरवणुकांत डीजेचा आवाज सोडून दारूच्या नशेत मारामारी करणाºया कार्यकर्त्यांची संख्या कमी झालेली नाही.मनातील चाळकरी जीवंत राहू दे!गिरणगावातून हद्दपार झालेल्या गिरण्यांप्रमाणेच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चाळींमध्ये आरती करण्याचा तोच उत्साह अद्याप कायम दिसतो. पुनर्विकासानंतर चाळींच्या जागी निर्माण झालेल्या काही टॉवरमध्ये आजही सायंकाळी ७ वाजल्यानंतर रात्री १० ते ११ वाजेपर्यंत टाळ-मृदुंगाच्या तालावर एका सुरात होणाºया आरत्या ऐकू येतात. जात, भाषा आणि पंथ सोडून एकमेकांच्या घरी जाऊन बाप्पाच्या आरतीत लीन होणारा चाळकरी आजही बहुतेकांच्या मनात जीवंत असल्याचे ते प्रतीक आहे. वर्षानुवर्षे तो चाळकरी असाच जीवंत राहू देत, हे एकच मागणे आज मुंबईकर श्रीगणेशाकडे मागत आहेत.स्पर्धा घातकचआपापसांतील स्पर्धेमुळे लालबाग, परळसारख्या विभागांतही मंडळा-मंडळांमध्ये मत्सराची भावना वाढीस लागली आहे. एकेकाळी संपूर्ण वाडीमध्ये (विभागाचा) असलेल्या एकमेव मंडळात फूट पडून आता गल्लोगल्लीत नव्हे, तर प्रत्येक सोसायटीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला आहे. हे चांगले की वाईट? हा मात्र चर्चेचा विषय आहे.- उपगनरात आजही गणेशोत्सवावर होणाºया खर्चाचे आकडे बरेच काही सांगून जातात. राजकीय कार्यकर्त्यांचा मंडळांतील शिरकाव आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही मंडळांना तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मुख्य हेतूचाच विसर पडला आहे की काय, असा प्रश्न पडतो.

टॅग्स :गणेशोत्सव