Join us

वर्सोव्यातील पहिल्या जेनेरिक मेडिसीन स्टोअर्सचे गिरीष बापट यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 3:53 PM

वर्सोव्यतील नागरिकांना स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर वर्सोव्यात जेनेरिक मेडिसिन्सची चळवळ सुरू केली आहे ही खरोखरीच कौतुकास्पद असून राज्यातील ग्रामीण भागात 250 जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स लवकरच सुरू करण्यात येतील असे ठोस आश्वासन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी काल सायंकाळी वर्सोव्यात दिले.

 - मनोहर कुंभेजकर 

मुंबई - वर्सोव्यतील नागरिकांना स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर वर्सोव्यात जेनेरिक मेडिसिन्सची चळवळ सुरू केली आहे ही खरोखरीच कौतुकास्पद असून राज्यातील ग्रामीण भागात 250 जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स लवकरच सुरू करण्यात येतील असे ठोस आश्वासन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी काल सायंकाळी वर्सोव्यात दिले.राज्यातील सरकारी रुंग्णालयात येणारे रुग्ण हे औषधाविना राहू नये म्हणून तीन महिन्यांपूर्वीच सरकारने 163 कोटींची औषध खरेदी केली आहे. तसेच रेशनिंग दुकानात नागरिकांना 4000 क्विटल धान्य पुरवठा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.वर्सोव्यातील पहिल्या जेनेरिक मेडिसीन स्टोअर्सचे  शानदार उदघाटन  त्यांच्या झाले झाले,त्यावेळी ते बोलत होते. देशातील गरजू महिलांना मोफत सॅनेटरी नॅफकीन पॅड उपलब्ध करून देणाऱ्या आणि पॅड वुमन अशी ख्याती असलेल्या आमदार डॉ. लव्हेकर येथे आता जेनेरिक मेडिसीनच्या चळवळीच्या माध्यमातून वर्सोवा यारी रोड येथे चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलच्या समोर जेनेरिक मेडिसीन स्टोअर्स सुरू केले आहे. वर्सोवा,यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल येथे झालेल्या  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विनायक मेटे होते.यावेळी चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलचे(सीडब्ल्यूसी)चे प्राचार्य व शिक्षणतज्ञ प्राचार्य अजय कौल,कूपर हॉस्पिटलचे डीन डॉ.गणेश शिंदे,किशोर रहेजा,अब्बास भोजानी, सीडब्ल्यूसीचे ऍक्टिव्हिटी चेअरमन प्रशांत काशीद आदी मान्यवर आणि येथील सर्व जाती धर्माचे नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गिरीष बापट पुढे म्हणाले की,वर्सोव्यातील उंच इमारती,सुंदर रस्ते,वर्सोवा कोळीवाडा,गुण्या गोविंदाने येथे राहत असलेली सर्व जाती धर्माची चांगली माणसे,प्राचार्य अजय कौल यांची दर्जेदार शिक्षण संस्था असे जगाचे सुंदर दर्शन येथे दिसल्यामुळे मला तर वर्सोव्याला आल्यावर  मला तर फॉरेनलाच आल्यासारखे वाटले असे गौरवोद्गार त्यांनी काढले.मी कडक शिस्तीचा माणूस आहे,सहसा कोणाचे कौतुक करत नाही,मात्र वर्सोव्यातील सर्वसामान्य  नागरिक व महिला हा केंद्रबिंदू ठेऊन वर्सोव्याच्या सर्वांगिण विकासाबद्धल आमदार लव्हेकर सतत जागरूक असतात,आणि येथील प्रश्न त्या पोटतिडकीने विधानसभेत त्या मांडतात असे त्यांनी अभिमानाने सांगितले. देशातील जनता ही अन्न, पाणी आणि आरोग्य आदी सुविधांवाचून राहू नये ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ठाम भूमिका असून त्या दृष्टीने महाराष्ट राज्य प्रभावीपणे वाटचाल करत आहे.राज्यात बाल मृत्यूचे प्रमाण पूर्वीपेक्षा खुपच कमी झाले आहे. हृदय शस्त्रक्रियेसाठी पूर्वी लागणाऱ्या स्टेनची पूर्वी असलेली स्टेनची किंमत 1.5 लाखांवरून आपण केंद्र सरकारशी पाठपुरावा करून 28 हजार रुपयांवर आणली असे त्यांनी अभिमानाने सांगितले.गरजूंना वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्पर असून दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील एका रुग्णाने केवळ एका एसएमएस मुख्यमंत्र्यांना केल्यावर त्यांनी तातडीची 1 लाखांची मदत त्याला केली हा किस्सा त्यांनी सांगितला.गेली 40 वर्षे आपण राजकारणात असून कार्यक्रमात आयोजकांनी केलेला सत्कार मी कधी घरी नेत नसून त्यांचे कार्यक्रमातच नागरिकांना परत भेट म्हणून देतो.या कार्यक्रमात एका अल्पसंख्याक महिलेच्या खांद्यावर तिचे छोटे मूल मंत्रीमहोदयांना दिसलेे. तिला खास स्टेजवर बोलावून त्यांनी शाल तर दिलीच पण बाळाच्या खाऊ साठी रोख रक्कम देखिल देऊन उपस्थित सर्वांनाच त्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत आश्चर्याचा सुखद धक्का दिला. आपल्या प्रास्ताविक भाषणात आमदार डॉ.भारती लव्हेकर म्हणाल्या की,येथे जेनरिक मेडिसीन स्टोअर्स सुरू करावे अशी येथील नागरिकांची विशेष करून जेष्ठ नागरिकांची मागणी होती,त्यांना आरोग्य सुविधांसाठी पदरमोड करावी लागत होती.त्यांचा डॉक्टरांच्या तपासणी शुल्कापैकी 70-80 टक्के खर्च औषधांवरच होतो.मात्र जेनेरिक औषधे खरेदी करून आता मोठा आर्थिक दिलासा देता आला.सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांकडे कमाईचे कुठलेही साधन नसते आणि त्यांच्यासाठी ही जेनेरिक औषधे वरदान ठरतील. त्यामुळे प्रत्येक रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकाने डॉक्टरांना जेनेरिक औषधे प्रिस्क्राईब करण्याचा आग्रह करावा असे आवाहन त्यांनी केले. वर्सोव्यातील पहिल्या जेनेरिक औषधांचे स्टोअर्सचा जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा. वर्सोव्यात ठिकठिकाणी अशा प्रकारची जेनेरिक औषधांची  स्टोअर्सची मालिकाच सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

आमदार विनायक मेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,गेल्या अनेक वर्षात वर्सोव्याचा विकास झाला नव्हता,तो आमदार डॉ.लव्हेकर यांनी गेल्या साडेतीन वर्षात करून दाखवला.त्यांनी सुरू केलेल्या डिजिटल सॅनेटरी पॅड बँकेची दखल पंतप्रधान नरेंद मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली असून गेल्या 20 जानेवारी रोजी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.गेली 3 वर्षे वर्सोवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करून सलग तीन वर्षे मुख्यमंत्री या महोत्सवाच्या उदघाटनाला आवर्जून असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईभारती लव्हेकर