गिरीश कर्नाड यांना टाटा लिटरेचर लाइव्ह जीवनगौरव पुरस्कार २०१७ जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 02:31 PM2017-11-01T14:31:28+5:302017-11-01T14:31:41+5:30
सुप्रसिद्ध भारतीयनाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांना यंदाचा टाटा लिटरेचर लाइव्ह जीवन गौरव पुरस्कार २०१७ जाहीर झाला आहे.
मुंबई- सुप्रसिद्ध भारतीयनाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांना यंदाचा टाटा लिटरेचर लाइव्ह जीवन गौरव पुरस्कार २०१७ जाहीर झाला आहे. यापुरस्काराचे वितरण टाटा लिटरेचर लाइव्हच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात १९ नोव्हेंबर २०१७रोजी होणार आहे .
यापूर्वी, भारतीय साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणारे लेखक अमिताव घोष यांना २०१६ मध्ये ,किरण नगरकर यांना २०१५ ला, एम टी वासुदेवननायर यांना २०१४ ला, खुशवंत सिंग यांना २०१३ मध्ये,सर व्ही. एस. नायपॉल यांना २०१२ मध्ये आणि महाश्वेता देवी यांना २०११ मध्ये टाटा लिटरेचर लाइव्ह जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते गिरीश कर्नाज त्यांच्या साहित्य रचनेबद्दल प्रसिद्ध आहेत. आजच्या आधुनिक काळातील सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत ऐतिहासिक, पौराणिक आणि लोकसाहित्यांची त्यांनी निर्मिती केली आहे. त्यामध्ये विचारवंतांनी गौरविलेल्या ययाती (१९६१),ऐतिहासिक तुघलक (१९६४) तसेच हयावदना (१९७१),नागामंडळ (१९८८) आणि तालेदंड (१९९०) या पुस्तकांचा समावेश आहे.
गेली ५० वर्षे गिरीश कर्नाड यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. 'बेंडा कालू ऑन टोस्ट' ही त्यांची२०१२ मधील उत्कृष्ट कलाकृती असून त्यामध्ये शहरीस्थलांतर, पर्यावरणाची हानी व ग्राहकदायी दृष्टिकोनयासारख्या महत्वाच्या मुद्दांवर उत्कृष्ठ अभिनय केलागेला आहे. या नाटकाचे मराठी आणि इंग्रजी भाषांतरेसुद्धा आहेत.
यासंदर्भांत गिरीश कर्नाड यांनी सांगितलेकि, "एखादा कवी, कथाकार, निबंधकार अथवा प्रेमपत्रलिहिणारी व्यक्ती कोणा एका व्यक्तीला संबोधित करतअसते. ज्यांच्याविषयी ते आहे त्यांनी जर मान्यता दिलीतर लेखक यशस्वी झाला असे म्हटले जाते. पणदुसरीकडे मात्र नाटककार त्याच्या समोरील सर्वप्रेक्षकांना संबोधित करत असतो. त्यालाऐकण्यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतुन आलेल्या शेकडोव्यक्ती असतात त्याचे लक्ष्य वेधणे एक आव्हान असते,आणि त्याला त्या समूहातील प्रत्येक सदस्यांची पूर्तताएकाचवेळी आणि अर्थपूर्णपणे करावी लागते. याशिवाय,या प्रक्रियेत सहभागी झालेले दिग्दर्शक, सहकारी,पोशाख सहायक यांची संपूर्ण गुंतवणूक लागते. म्हणूनचनाटक हे क्लिष्ट जगत आहे. शब्दामध्ये विणलेल्या मानवीसंबंधाचे ते एक बुद्धिमान नेटवर्क आहे, म्हणूनच जेव्हासर्वात शेवटी कोणीतरी यशस्वी झाला म्हणून सांगितलेजाते तो फारच आनंददायी अनुभव आहे