Join us

गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी लवकरच मुंबईला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 2:10 PM

दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर कोरोणा चाचणी केली असता, मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत होतो.

ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर कोरोणा चाचणी केली असता, मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत होतो.

जळगाव - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन सरकार आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यातच, नेतेमंडळी व अधिकारी यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याचे विभागाीय आयुक्त सौरभ राव यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. आता, भाजपा नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.   

दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर कोरोणा चाचणी केली असता, मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत होतो. पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या ३-४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, अशी माझी विनंती आहे, असे ट्विट गिरीश महाजन यांनी केलंय. तसेच, आपणा सर्वांचे प्रेम व आशीर्वाद पाठीशी आहेतच, लवकरच नव्या जोमाने आपल्या सेवेत दाखल होईल !, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे, गेल्या 2 दिवसांत गिरीश महाजन यांच्या संपर्कात कोण कोण नेतेमंडळी आली होती, हेही पाहावे लागणार असून त्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. 

 

टॅग्स :गिरीश महाजनकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस