Shivsena: अब्दुल सत्तारांना जादू की झप्पी, गाववाल्यास पाहून गिरीश महाजनांना आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 10:55 PM2022-07-02T22:55:32+5:302022-07-02T22:56:50+5:30

मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलबाहेर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे दिग्गज नेते येथे पोहोचले होते.

Girish Mahajan is happy to see Abdul Sattar as well as gulabrao patil in mumbai hotel taj | Shivsena: अब्दुल सत्तारांना जादू की झप्पी, गाववाल्यास पाहून गिरीश महाजनांना आनंद

Shivsena: अब्दुल सत्तारांना जादू की झप्पी, गाववाल्यास पाहून गिरीश महाजनांना आनंद

googlenewsNext

मुंबई -  राज्यातील राजकीय भूकंपानंतर सत्तांतर झाल्याचं देशाने पाहिलं. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर, तब्बल 12 दिवसांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांनी आज मुंबईत पाऊल ठेवले. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासमवेत विमानात आणि बसमधून आल्याचं पाहायला मिळालं. मुंबई विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी भाजप नेते हजर होते. स्वत: चंद्रकांत पाटील यांनी आमदारांचं आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. भाजप नेते आणि बंडखोर आमदारांनी एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी, अब्दुल सत्तारांचीही गळाभेट घेतली.  

मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलबाहेर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे दिग्गज नेते येथे पोहोचले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गिरीश महाजन, राम कदम हे शिवसेनेच्या आमदारांच्या स्वागतासाठी हॉटेलमध्ये प्रवेशद्वारावर उभे होते. यावेळी, प्रत्येक आमदाराचे हातात हात देऊन स्वागत होते होते. अब्दुल सत्तार यांना पाहून जळगावचे नेते आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांना आनंद झाला. त्यावेळी, गाववाल्या म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव पाटील यांना हाक मारुन त्यांनी अब्दुल सत्तारांचे स्वागत केले. सत्तार यांना जादू की झप्पी दिली, यावेळी उदय सामंत हेही त्यांच्यासमवेत होते. 

एकनाथ शिंदे आपल्यासोबतच्या बंडखोर 50 आमदारांची काळजी घेत आहेत. म्हणूनच, 50 आमदारांना मुंबईला आणण्यासाठी ते स्वत: गोव्याला गेले होते. एकनाथ शिंदेंचा आमदारांसमवेत बसमधील एक व्हिडिओ समोर आला होता. आता, ह्या सर्व आमदारांचे मुंबईत आगमन झाले असून ते ताज प्रेसिडेंट हॉटेलवर उतरले आहेत. ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये सध्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व आमदारांचा आजचा मुक्कम येथे असणार आहे. 

शहाजी बापूंना पाहून भाजप नेत्यांना आनंद

गिरीश महाजन यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना पाहताच चंद्रकांत पाटील यांना डोंगारफेम व्हायरल कॉलची आठवण करुन दिली. त्यावेळी, चंद्रकांत पाटलांसह इतरही भाजप नेत्यांना अतिशय आनंद झाला. शहाजी पाटील यांनी चक्क चंद्रकांत पाटील यांचे पाय धरले, त्यावेळी पाटील यांनीही शहाजी पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

Web Title: Girish Mahajan is happy to see Abdul Sattar as well as gulabrao patil in mumbai hotel taj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.