गिरीश शेट्टी ठरला ‘सरपंच श्री’
By Admin | Published: April 5, 2015 12:13 AM2015-04-05T00:13:32+5:302015-04-05T00:13:32+5:30
ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत टॉल गटातील गिरीश शेट्टीने अप्रतिम कामगिरी करताना ‘सरपंच श्री’ किताबावर कब्जा केला.
ठाणे : ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत टॉल गटातील गिरीश शेट्टीने अप्रतिम कामगिरी करताना ‘सरपंच श्री’ किताबावर कब्जा केला. संतोष पाटीलने या वेळी सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शकाचा मान मिळवला.
देवपे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेच्या टॉल गटात अपोलो जिमच्या (कळवे) गिरीशने एकहाती वर्चस्व राखल्यानंतर अंतिम फेरीत अनपेक्षित बाजी मारली. सुपर टॉम गटातील विजेता मिलिंद तरणेचे कोणतेही दडपण न घेता गिरीशने तगड्या मिलिंदला पिछाडीवर टाकून दिमाखदार विजेतेपद पटकावले.
तत्पूर्वी अपोलो जिमच्याच संतोष पाटीलने आपल्या पीळदार शरीरयष्टीचे जबरदस्त प्रदर्शन करताना एकच धमाल उडवून दिली. या जोरावर त्याने सहजरीत्या सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शकाचा मान मिळवला. सांघिक गटत टिटवाळाच्या माउलीकृपा व्यायमशाळेने सर्वाधिक १९ गुणांची कमाई करताना शानदार अजिंक्यपद मिळवले. आंबिवलीच्या शक्तिमान हेल्थ क्लबला १५ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)
च्शॉर्ट गट : विश्वनाथ माळी (शक्तिमान हेल्थ क्लब), रूपेश चव्हाण (स्फूर्ती व्यायामशाळा, ठाणे), आशित महाले (सुजय जिम्नॅशियम, ठाणे).
च्मिडियम गट : संतोष पाटील (अपोलो जिम), पंडित पाटील (निमकर जिम्नॅशियम, टिटवाळा), दत्ता बढे (माउलीकृपा व्यायामशाळा).
च्टॉल गट : गिरीश शेट्टी, प्रेम सागर (स्फूर्ती व्यायामशाळा, ठाणे), मयूर तरणे
(जय हनुमान व्यायामशाळा, शहापूर).
च्सुपर टॉल गट : मिलिंद तरणे (ओम साई हेल्थ क्लब, वाशिंद), विकी खटकर, सौरभ खटकर (दोघेही माऊलीकृपा व्यायामशाळा)