श्वानाना जेवण देताना तरुणीला मारहाण, विनयभंग; बोरिवलीतील घटना 

By गौरी टेंबकर | Published: October 17, 2023 06:36 PM2023-10-17T18:36:40+5:302023-10-17T18:37:29+5:30

भटक्या श्वानाना जेवण देताना बोरिवलीत एका २५ वर्षीय केक व्यावसायिकेचा विनयभंग करत तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली.

Girl beaten, molested while giving food to dogs Incidents in Borivali | श्वानाना जेवण देताना तरुणीला मारहाण, विनयभंग; बोरिवलीतील घटना 

श्वानाना जेवण देताना तरुणीला मारहाण, विनयभंग; बोरिवलीतील घटना 

मुंबई: भटक्या श्वानाना जेवण देताना बोरिवलीत एका २५ वर्षीय केक व्यावसायिकेचा विनयभंग करत तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. सदर घटनेची माहिती तिने व्हिडियो पोस्ट करत दिली असुन याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी अमन बनसोडे (२८) नामक तरुणावर सोमवारी गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.

तक्रारदार हिचे वडील उच्च न्यायालयात कार्यरत असून ती स्वतः घरातून केकचा तर भाऊ टूर्स अँड ट्रव्हेल्सचा व्यवसाय करते. पिडीत तरुणी ॲनिमल फिडर असून गेल्या तीन चार वर्षापासून भटक्या श्वानांना अन्न देण्याचे काम करते. तिच्या तक्रारीनुसार १५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता ती नेहमीप्रमाणे भटक्या श्वानांना खाऊ घालत असताना शेजारच्या भिंतीवर बसलेला बनसोडे याने तिच्याकडे पाहत अश्लील भाषेत शेरेबाजी केली. त्याचा जाब तिने विचारल्यावर आरोपीने तिचे केस ओढले आणि तिची कुर्ती पकडून विनयभंग केला. तिला सोडवायला आलेले तिचे आई-वडील आणि भाऊ यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर जखमी कुटुंबाने शताब्दी रुग्णालयात उपचार घेतले आणि एमएचबी कॉलनी पोलिसात तक्रार केली. त्यानुसार बनसोडे विरोधात पोलिसांनी विनयभंग तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. 

Web Title: Girl beaten, molested while giving food to dogs Incidents in Borivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.