Join us

राज्यात 43 मॉडेल स्कूलसह गर्ल होस्टेल

By admin | Published: August 20, 2014 2:24 AM

शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या आदिवासी दुर्गम भागातील मुला-मुलींसाठी राज्यातील 1क् जिल्ह्यांमध्ये इंग्रजी माध्यमाची 43 मॉडेल स्कूल व गल्र्स होस्टेल उभारणीला मंजुरी मिळाली आहे.

सुरेश लोखंडे - ठाणो
शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या आदिवासी दुर्गम भागातील मुला-मुलींसाठी राज्यातील 1क् जिल्ह्यांमध्ये इंग्रजी माध्यमाची 43 मॉडेल स्कूल व गल्र्स होस्टेल उभारणीला मंजुरी मिळाली आहे. यात नवनिर्मित पालघर जिल्ह्यात पाच स्कूल उभारली जाणार आहेत. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून 182 कोटी 38 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, विद्याथ्र्यासाठी इयत्ता 6वी ते 12वीर्पयतच्या शिक्षणाची आणि निवासाची सोय होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भात अध्यादेश जारी करून स्कूल आणि होस्टेल उभारणीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. या प्रकल्पाची प्रभावी व सक्षम अंमलबजावणी व्हावी यासाठी ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागातील या सर्व शाळांसाठी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. एका मॉडेल स्कूलसाठी सुमारे 3 कोटी 2 लाख रुपये खर्च येणार आहे. यानुसार 43 स्कूलसाठी 129 कोटी 86 लाख तर गल्र्स होस्टेलसाठी 52 कोटी 52 लाख रुपये केंद्र शासनाने मंजूर केले आहेत.
 नवनिर्मित पालघर जिल्ह्यातील तलासरी, जव्हार, डहाणू, मोखाडा व विक्रमगड या पाच तालुक्यांत या स्कूल व होस्टेलचे काम प्रगतिपथावर आहे. तलासरीमधील स्कूलचे काम पूर्णत्वास आले असून, उर्वरित स्कूलसाठी आवश्यक जागेचे प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडे सादर करण्यात आले आहेत. 
याप्रमाणोच बीड जिल्ह्यातील गेवराई, धारूर, वडवणी तालुके तर गडचिरोलीमधील धानोरा, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी तालुक्यातही अशा प्रकारची स्कूल आणि होस्टेल बांधण्यात येणार आहेत. याशिवाय जालना जिल्ह्यात जालना, अंबड, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा आणि भोकरधन तसेच परभणी जिल्ह्यात सेलू, मानवत, परभणी, पुर्णा, पाथरी, जिंतूर, गंगाखेड तालुका याशिवाय कोल्हापूरमधील गगनबावडा तालुक्यात स्कूल बांधली जातील.हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुका, नांदेडमधील धर्माबाद, मुदखेड, उमरी, बिलोली. नंदुरबारच्या अक्कलकुआ, अक्राणी, तळोदा, नवापूर, नंदूरबार, शहादा. तर नाशिकमधील पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मॉडेल स्कूल व होस्टेल उभारली जाणार आहेत.
 
च्मॉडेल स्कूल व गल्र्स होस्टेल या दोन्ही योजनांच्या बांधकामांसाठी पाच एकर जागा लागणार आहे. या स्कूलला लागून गल्र्स होस्टेल उभारले जाणार असून, यात इयत्ता 9वी ते 12वीर्पयतच्या विद्याथ्र्याची निवासाची व्यवस्था होईल.
 
च्एका मॉडेल स्कूलसाठी सुमारे 3 कोटी 2 लाख रुपये खर्च येणार आहे. यानुसार 43 स्कूलसाठी 129 कोटी 86 लाख तर गल्र्स होस्टेलसाठी 52 कोटी 52 लाख रुपये केंद्र शासनाने मंजूर केले आहेत.