‘पतंजली’च्या नावाने महिलेला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:22 AM2017-12-27T02:22:01+5:302017-12-27T02:22:04+5:30

मुंबई : रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेदिक कंपनीच्या वस्तूंचे वितरक बनविण्याच्या बहाण्याने एका महिलेला इंटरनेटवरून दोघा भामट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला.

The girl named 'Patanjali' | ‘पतंजली’च्या नावाने महिलेला गंडा

‘पतंजली’च्या नावाने महिलेला गंडा

Next

मुंबई : रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेदिक कंपनीच्या वस्तूंचे वितरक बनविण्याच्या बहाण्याने एका महिलेला इंटरनेटवरून दोघा भामट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला. याबाबत घाटकोपर येथील मोनिका धरोड यांनी साकीनाका पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
मोनिका धरोड यांच्याशी दोघांनी ५ डिसेंबरदरम्यान इंटरनेटवरून संपर्क साधला. पतंजली कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांना वितरक कंपनी बनविण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी बॅँकेच्या खात्यावर आॅनलाइन ‘एनएफटी’ करून २ लाख १० हजार रुपये भरण्यास सांगितले.
मोनिका यांनी १३ डिसेंबरला रक्कम भरल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित भामट्यांंचा मोबाइल बंद होता. म्हणून सोशल मीडियाद्वारे संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता, दोघांनी सोशल मीडियावरील खातेही बंद केले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

Web Title: The girl named 'Patanjali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.