तरुणी चालल्या जगभ्रमंतीला; ९० दिवस, २३ देश, ४० हजार किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 05:35 AM2018-07-29T05:35:18+5:302018-07-29T05:35:40+5:30

बॉम्बे फ्लाइंग क्लबमध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेतलेल्या आरोही पंडित (२२) व केइथेर मिसक्विटा (२३) या दोन मुंबईकर वैमानिक तरुणी विश्वभ्रमंतीला निघणार आहेत.

Girl-running world-famous; 90 days, 23 countries, 40 thousand km journey | तरुणी चालल्या जगभ्रमंतीला; ९० दिवस, २३ देश, ४० हजार किमी प्रवास

तरुणी चालल्या जगभ्रमंतीला; ९० दिवस, २३ देश, ४० हजार किमी प्रवास

Next

- खलील गिरकर

मुंबई : बॉम्बे फ्लाइंग क्लबमध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेतलेल्या आरोही पंडित (२२) व केइथेर मिसक्विटा (२३) या दोन मुंबईकर वैमानिक तरुणी विश्वभ्रमंतीला निघणार आहेत. मिनी बसच्या लांबीएवढ्या ‘माही’ या छोटेखानी विमानातून त्यांचा प्रवास सुरू होणार आहे. ९० दिवसांत त्या २३ देशांना भेट देतील. त्या अटलांटिक व प्रशांत महासागर पार करणार आहेत. रविवारी हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर त्या दौऱ्याचा निर्णय घेतील.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाकडून या मोहिमेला प्रोत्साहन मिळाले आहे. विंग कमांडर (नि.) राहुल मोंगा यांनी मार्गदर्शन करून आमच्या इच्छाशक्तीला बळ दिल्याची भावना या दोघींनी व्यक्त केली. दक्षिण पूर्व आशिया, जपान, रशिया, कॅनडा, अमेरिका, ग्रीनलॅण्ड, आइसलॅण्ड, युरोप, मध्य पूर्व या भागांतून जाताना पर्वतरांगा, समुद्र, वाळवंट, जंगल, दºया अशा भागांतून प्रवास करणार आहेत.

सामाजिक संदेश देणार
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेशही या माध्यमातून दिला जाणार आहे. पटियाळा येथून या वैमानिक तरुणी माही विमानाचे उड्डाण करतील. दोन्ही तरुणींना नुकताच बॉम्बे फ्लाइंग क्लबमधून व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळाला आहे. प्रति तास २५० किमी एवढ्या कमाल वेगाने त्यांना प्रवास करता येईल.
या मोहिमेबद्दल मोठी उत्सुकता असल्याची भावना आरोही व केइथेर यांनी व्यक्त केली आहे. आमचा
आदर्श घेऊन देशातील शेकडो तरुणी नागरी हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला अधिकाºयांनी आयएनएसव्ही तारिणीद्वारे समुद्रामार्गे केलेल्या विश्वभ्रमंतीमधून प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्या मुलीची या आव्हानात्मक मोहिमेसाठी निवड झाल्याने मला आनंद झाला आहे. खडतर असा हा प्रवास या दोन्ही तरुणी यशस्वीपणे पूर्ण करतील, असा विश्वास आहे.
- गिल्रॉय मिसक्विटा, केइथेर मिसक्विटाचे वडील

Web Title: Girl-running world-famous; 90 days, 23 countries, 40 thousand km journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई