मुंबईबाहेरुन शिक्षणासाठी आलेल्या महिलांना ही विद्यालयं ठरताहेत आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 06:29 PM2017-11-17T18:29:09+5:302017-11-17T18:46:17+5:30
मुंबईबाहेरुन बऱ्याच विद्यार्थिनी शिकायला मुंबईत येतात. कोणी नातेवाईक नसल्याने त्यांना या महिला विद्यालयांचा खुप आधार असतो.
मुंबई : मुंबईत अनेक प्रसिद्ध कॉलेज आहेत. त्यात काही महिला कॉलेजही आहेत, जिथे शिकण्यासाठी लांबवरुन आलेल्या मुलींच्या राहण्याची सोय होते. मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुलींना शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करता यावी याकरता खास त्याकाळी महिलांसाठी महाविद्यालये स्थापण्यात आली होती. मुंबईत महिलांसाठी असलेली कॉलेजं कमी असली तरी तिकडे प्रवेश घेणाऱ्या महिलांची संख्या काही कमी नाही. नर्सिंग क्षेत्र आणि तांत्रिक क्षेत्रातही महिलांनी आघाडी घ्यावी या उद्देशाने मुंबईत गर्ल्स कॉलेजची स्थापना करण्यात आली आाहे. याच गर्ल्स कॉलेजविषयी आज आपण पाहुया.
एसएनडीटी विद्यापीठ
भारतातील सर्वात पहिलं महिला महाविद्यालय म्हणजे एसएनडीटी महाविद्यालय. हे महाविद्यालय म्हणजेच एक विद्यापीठ आहे. 1916 एसएनडीटी विद्यापीठाची स्थापना झाली. महिलांनी शिक्षण घ्यावं याकरता डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. या महाविद्यालयातून 1921 साली पाच महिला पदव्युत्तर झाल्या. चर्चगेट, किंग सर्कल आणि सांताक्रुझ याठिकाणी एसएनडीटी महाविद्यालये असून चर्चगेट आणि सांताक्रुझ येथे विद्यापीठाचे मुख्य कार्यालय आहे.
स्कूल ऑफ नर्सिंग गुरुनानक हॉस्पिटल
वांद्रेच्या गांधी नगर येथे असलेले स्कूल ऑफ नर्सिंग गुरुनानक हॉस्पिटल हे खास महिलांना योग्यप्रकारे नर्सिंगचं शिक्षण मिळावे याकरता स्थापन करण्यात आलेलं आहे. 2005 साली सुरू झालेल्या या कॉलेजमध्ये राज्यभरातून मुली नर्सिंग शिकायला येत असतात. महाराष्ट्र युनिर्व्हसिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या अख्यातरित हे महाविद्यालय येतं.
श्रीमती वेलाबाई चत्रभुज ट्रेनिंग नर्सिंग स्कूल
मुंबईतल्या ताडदेव येथे असलेली ही दुसरी महत्त्वाची नर्सिंग स्कूल आहे. उत्तोमत्तम नर्स आपल्या भारत देशातून घडाव्यात याकरता या नर्सिंग स्कूलची स्थापना झाली होती. सध्या या क्षेत्रातही अद्ययावत अभ्यासक्रम आल्याने या अभ्यासासाठी लागणारी अद्ययावत साधनंही या महाविद्यालयात आहेत.
(फोटो - प्रातिनिधिक)
पी.व्ही पॉलिटेक्निक महाविद्यालय
महिलांना योग्यप्रकारे तांत्रिक शिक्षण मिळावे याकरता स्थापन झालेलं महाविद्यालय म्हणजे प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक महाविद्यालय. तांत्रिक क्षेत्रात महिला काम करू शकत नाहीत, हा समज दूर करण्यासाठी आणि महिलांना तांत्रिक क्षेत्रात प्रगत करण्यासाठी या महाविद्यालयाकडून प्रयत्न केले जातात. उत्कृष्ट तंत्रनिकेतनासाठी देण्यात येणारा राज्य पुरस्कारही या महाविद्यालयाला मिळाला आहे.