Join us

शहीद जवानांच्या मुलींना घरपोच संगणक - सुनील राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 2:38 AM

अथर्व फाउंडेशनने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी ‘वन फॉर आॅल,आॅल फॉर वन’ ही संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात आली. त्यानंतर, आता शहीद जवानांच्या मुलींना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी

अथर्व फाउंडेशनने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी ‘वन फॉर आॅल,आॅल फॉर वन’ ही संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात आली. त्यानंतर, आता शहीद जवानांच्या मुलींना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदतीचा हात देणारा अत्यंत स्त्युत्य उपक्रम, पुन्हा एकदा या फाउंडेशनने हाती घेतला आहे. या माध्यमातून ‘बेटी पढाओ, बेटी बचाव’ ही उक्ती खरी ठरविणाºया उपक्रमाला सुरुवात झाली आहे. देशभरातील शहीद सैनिकांच्या १०० मुलींना घरपोच संगणक देण्यात येणार आहेत. याविषयी, गेल्या १४ वर्षांपासून मुंबई भाजपाचे सरचिटणीस असणारे आणि अथर्व फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुनील राणे यांच्याशी केलेली ही खास बातचीत...शहीद जवानांच्या मुलींसाठी हाती घेतलेल्या उपक्रमाविषयी सांगा?- ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ या संकल्पनेवर काम करून, अत्यंत यशस्वीरीत्या हा उपक्रम राबविण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अथर्व फाउंडेशनने नवा उपक्रम हाती घेतला आहे. ‘१०० कॉम्प्युटर्स, १०० डॉटर्स, १०० डेज्’ असे या उपक्रमाचे नाव आहे. शहीद जवानांच्या मुलींसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी देशाच्या कानाकोपºयातील त्यात हरयाणा, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पंजाब अशा विविध राज्यांच्या दुर्गम भागांत जाऊन, या कुटुंबांची फाउंडेशनने भेट घेतली आहे. त्यांच्याकडे जाऊन सर्व माहिती, तपशील घेऊन साधारण इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थिनींचा सर्व डेटा फाउंडशनने एकत्र केला आहे. या उपक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या सहकार्याने १०० विद्यार्थिनींना घरपोच संगणक आणि लॅपटॉप भेट दिले जाणार आहेत. शिवाय, प्रत्येक तीन वर्षांनंतर हे संगणक अद्ययावत करण्यात येतील. याकरिता, फाउंडेशनने १०० प्रशिक्षकांची निवड केली आहे. त्यांच्याअंतर्गत असणाºया स्वयंसेवकांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्राथमिक पातळीवर याचे काम सुरू झाले असून, लवकरात लवकर या उपक्रमाचे अनावरण दिग्गजांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या उपक्रमाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपºयात फिरताना कोणत्या समस्या प्रकर्षाने जाणवल्या?- शहिदांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन योग्यरीत्या झाले पाहिजे. त्यात अनेक त्रुटी आहेत. देशातील बºयाच शहिदांच्या विधवांचे वय खूप कमी आहे. मात्र, त्या सुशिक्षित आहेत. त्यामुळे अशा तरुण विधवांना शासनाच्या विविध योजनांतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून, कुटुंबाला हातभार लागेल. शिवाय, त्या स्वत: सक्षम होतील. याखेरीज, कुटुंबांना पुरविण्यात येणाºया योजना या एकाच व्यासपीठांर्गत मिळाल्या, तर जास्त सोईस्कर ठरेल. बºयाचदा कुठल्या तरी खेड्यापाड्यांत, डोंगरदºयांत राहणाºया या कुटुंबीयांचे शासकीय कार्यालयांच्या हेलपाटा घालण्यातच आयुष्य जाते, तसेच कोणत्याही राज्यातील सैनिक असो वा त्यांचे कुटुंबीय, त्यांनाही कुठल्याही राज्यात विशेष तरतुदींतर्गत प्राधान्याने सेवा द्यावी, ही आमची मागणी आहे.अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात काय स्थिती आहे?- देशासाठी आपलं सर्वस्व आणि आयुष्यही देणाºया जवानांना त्यांचा कार्यकाल संपल्यावर, निवृत्तीवेतनासारख्या हक्काच्या गोष्टी सहजपणे मिळतातच असे नाही. आज आपल्या देशात अनेक जवानांना आणि निवृत्त अधिकाºयांना, त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना योग्य ते निवृत्तीवेतन मिळत नाही. वीरमाता आणि वीरपत्नींच्या कहाण्या यापेक्षा वेगळ्या नाहीत. हे लोक विखुरलेले आणि बºयाच वेळा अल्पशिक्षित असल्याने, त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव नसते. म्हणून केवळ अज्ञानापोटी आणि औपचारिकपणे लढा देणे आवाक्याबाहेर वाटल्यामुळे ते निवृत्तीवेतनापासून वंचित राहतात. नियमाप्रमाणे आपल्याला किती रक्कम मिळायला हवी, सरकारकडून किती येणे आहे, याविषयी बºयाचदा सैनिक, त्यांचे कुटुंबीय अनभिज्ञ असतात. निवृत्त सैनिक महाराष्ट्रभर विखुरलेले असल्याने, त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड काम आहे. शासनाची आणि पेन्शन वाटपाची जबाबदारी असलेल्यांची अनास्था, निवृत्त सनिकांचे कायद्याबाबतचे अज्ञान आणि असंघटितपणा, यामुळे हे काम कठीण झाले आहे. केवळ अज्ञानापोटी आणि औपचारिकपणे लढा देणे आवाक्याबाहेर वाटल्यामुळे ते निवृत्तीवेतनापासून वंचित राहतात. सैनिकांसाठी साडेआठ लाख रुपयांचा निधी आता २५ लाख करण्यात आला आहे. मात्र, याविषयीचा लेखी निर्णय जाहीर झाला नसल्याने याचा पाठपुरावा करत आहोत. राज्यातील तरुणाईही मोठ्या प्रमाणात लष्करात सहभागी होऊ इच्छिते. मात्र, बºयाचदा योग्य, अचूक मार्गदर्शनाअभावी त्यांना प्रवेशास मुकावे लागते, ही वस्तुस्थिती आहे, हे चित्र बदलण्यासाठीही फाउंडेशन भविष्यात काम करणार आहे.अथर्व फाउंडेशनच्या कार्याविषयी सांगा?- २०१६ साली अथर्व फाउंडेशनच्या कामाला सुरुवात झाली. देशाचा विकास आपल्या समाजाच्या विविध विभागांच्या विकासावर अवलंबून आहे. या थोर विचारांनी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी कार्य केले जाते. मात्र, त्याचप्रमाणे अन्य समाजोपयोगी कार्यातही पुढाकार घेतला जातो. आरोग्य, मुलींचे शिक्षण, स्त्री सक्षमीकरण, ग्रामविकास, पर्यावरण संरक्षण, नामशेष होणाºया कलांना व्यासपीठ देणे, असे विविध उपक्रम फाउंडेशनच्या साहाय्याने देशासह राज्याच्या कानाकोपºयांत राबविण्यात येतात.मुलाखत - स्नेहा मोरे