म्हणून मुंबईच्या पोरी स्वत:ला समजतात ‘डॅशिंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 04:25 PM2018-01-02T16:25:38+5:302018-01-02T17:06:30+5:30

दिल्ली आणि मुंबईच्या मुलींमध्ये जो बिंधास्तपणा असतो तो इतर कोणत्याच शहरातल्या मुलींमध्ये नसतो. म्हणुनच त्या स्वत:ला 'भारी' समजतात.

girls from mumbai are dashing than other cities than India | म्हणून मुंबईच्या पोरी स्वत:ला समजतात ‘डॅशिंग’

म्हणून मुंबईच्या पोरी स्वत:ला समजतात ‘डॅशिंग’

googlenewsNext
ठळक मुद्दे नव्या जुन्या गोष्टींना एकरूप करण्याचं तंत्र या मुंबईच्या मुलींना अवगत असल्याने त्या नेहमीच एका वगेळ्या लुकमध्ये दिसतात. मुंबईमध्ये फक्त हायक्लास सोसायटीमध्ये राहाणाऱ्या तरुणी अशा वेगळ्या वाटा धुंडाळतात असं नाही तर आज कित्येक चाळीत राहणाऱ्या तरुणी वरच्या पदावर काम करताना दिसतात. 

मुंबई : मुंबईची पोरगी म्हटल्यावर तुमच्या डोक्यात आधी काय विचार येतो? डॅशिंग, बिंधास्त, डेरिंगबाज वगैरे. पण या पलीकडेही मुंबईच्या पोरींची एक वेगळी ओळख आहे. सुसंस्कारी असल्या तरीही वेळ पडलीच तर समोरच्याला धुळ चारायलाही कमी पडणार नाहीत. आपण आज पाहणार आहोत की, मुंबईच्या मुली इतर शहरातील मुलींपेक्षा का वेगळ्या आहेत.

सांभाळून घेणं त्यांच्या रक्तातच

मुंबईतील गर्दी तुम्हाला काही नव्याने सांगायला नको. ट्रेनमधल्या गर्दीत स्वत:ला सावरत उभं राहायचं म्हणजे जिकरीचंच काम. ट्रेनमध्ये जो व्यवस्थित अॅडजस्ट करू शकला त्याच्याकडे उत्तम नियोजन कौशल्य असल्याचं मुंबईकरांचं म्हणणं आहे. ए‌वढंच नव्हे तर मुंबईतले अनेक रस्ते अरुंद आहेत, या अरुंद रस्त्यावरून चालताना आपला इतरांना त्रास होणार नाही आणि इतर आंबट शौकिन लोकांचा स्पर्श होणार नाही याची दक्षता घेऊन चालण्याची शिस्त मुंबईकर मुलींमध्येच आढळून येते. त्यामुळे अॅडजस्ट करणं हे मुंबईकर मुलींच्या रक्तातच असल्याचं म्हटलं जातं. 

स्वतंत्र पर्यटक

मुंबईतील मुली एकट्या कुठेही भटकू शकतात. त्या सोलो ट्रव्हलर आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी ज्या मुली अगदी बिंधास्त फिरू शकतात, त्या मुली जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एकट्या राहू शकतात. या मुलींना स्वंतत्र राहण्याचं जणू बाळकडूच पाजलेलं असतं. त्यामुळेच आज तुम्ही ट्रेनमधून येता-जाता पाहू शकता पुरुषांपेक्षाही महिलांच्या डब्यातच जास्त गर्दी असते. 

आणखी वाचा - सड्डी दिल्ली की आमची मुंबई? कोणतं शहर आहे सरस?

माज नसलेल्या मुली

कसलाही माज न ठेवता अत्यंत साध्या पद्धतीने राहायला मुंबईच्या मुलींना आवडतं. प्रत्येक गोष्ट शेअर करत त्यांना जगायला आवडतं. अगदी शेअर रिक्षापासून ते ट्रेनच्या सीटपर्यंत सगळीकडेच या मुली अॅडजस्ट करायला शिकतात. उलट सगळ्यांना सोबत घेऊनच त्या फिरत असतात. त्यांच्या या स्वभावामुळेच त्या इतरांना लगेच आपलंसं करतात. 

पारंपारिक तरीही बिंधास्त

तुम्ही कधी गुढीपाडव्याला गिरगावसारख्या विभागात फेरफटका मारला तर तुम्हाला मुंबईच्या मुलींचं एक वगेळं रुप दिसेल. एकदम पारंपारिक वेशात रॉयल एनफिल्ड, अॅवेंजरसारख्या बाईकवर राईड करताना दिसतील. त्यांचा हाच अॅटीड्यूड त्यांची ओळख निर्माण करतो. नव्या जुन्या गोष्टींना एकरूप करण्याचं तंत्र या मुंबईच्या मुलींना अवगत असल्याने त्या नेहमीच एका वगेळ्या लुकमध्ये दिसतात. मुंबईत वनपीस किंवा हॉट शॉट घातलेली तरुणी जितकी बिंधास्त आहे तेव्हढीच सलवार कमिझ वा साडी परिधान केलेली तरुणी बिंधास्त आहे. त्यामुळे एखादीच्या कपड्यांवरून तुम्ही तिला अबला समजलात तर तुम्हालाच महागात पडेल.

आणखी वाचा - मुंबईतल्या या काही गोष्टी ठरल्या भारतातील पहिल्या

इंटरनेट सेन्सेशन मिथिला पालकरसुध्दा मुंबईचीच

तुम्हाला मुंबईची मिथिला पालकर आठवतच असेल. दादरच्या एका चाळीत राहणारी ही तरुणी आता कित्येकांची आवडती बनली आहे. तिचं उदाहरण द्यायचं कारण म्हणजे मुंबईमध्ये कोण कुठं राहतं यावर काहीच अवलंबून नाही. प्रत्येकीनं आपल्या जोरावर आपलं करिअर सुरू केलंय आणि त्या करिअरमध्ये यशही मिळवलंय. त्यामुळे मुंबईमध्ये फक्त हायक्लास सोसायटीमध्ये राहाणाऱ्या तरुणी अशा वेगळ्या वाटा धुंडाळतात असं नाही तर आज कित्येक चाळीत राहणाऱ्या तरुणी वरच्या पदावर काम करताना दिसतात. 

नाईट लाईफ इज नो मॅटर

मुंबई ही इतर शहरांच्या तुलनेत फार सुरक्षित आहे. गेल्या काही दिवसात तरुणींच्या बाबतीत काही वाईट प्रकरणं घडली मात्र तरीही मुंबईच्या मुली खचल्या नाहीत. आजही कित्येक महिला कामावरून घरी एकट्या घरी येतात. कित्येक महिला न घाबरता नाईट ड्युटी करतात. मुंबईत माध्यमांची अनेक कार्यालये आहेत, या कार्यालयांमध्ये कित्येक महिला नाईट शिफ्ट करताना दिसतात. याचाच अर्थ मुंबईच्या मुलींसाठी नाईट लाईफ डसन्ट मॅटर.

मुंबईसंदर्भातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

गोड शब्दांची स्तुतीसुमनं

साध्या सरळ वाटणाऱ्या एखाद्या मुलीच्या तोंडून तुम्ही जर शिव्या एकल्या तर नवल वाटायला नको. मुंबईच्या मुली स्वत:हून कोणाच्या वाट्याला जात नाहीत. पण कोणी तिच्या वाट्याला गेलंच तर ती कोणालाही सोडत नाही. मग तुम्हाला तिच्या गोड शब्दांचे बोल स्तुतीसुमनं तुम्हाला ऐकावीच लागणार. त्यामुळे एखादी मुलगी तुम्हाला साधी सरळ आणि अबोल वाटली तरी त्या ‘अबले’चा फायदा घेण्याचा अजिबात विचार करू नका. 

Web Title: girls from mumbai are dashing than other cities than India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.