नवी मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या आगामी निवडणुका जी.आय.एस. प्रणालीनुसार घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी आज संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.निवडणूक आयोगाच्या माहिती व तंत्रज्ञान समितीने दोन दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयास भेट देऊन आयुक्त जऱ्हाड आणि संबंधित अधिकाऱ्यांना जी.आय.एस. प्रणालीविषयी माहिती दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून आज आयुक्तांनी संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या तंत्रज्ञाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी महापालिकेचे निवडणूक उपायुक्त अमरीश पटनिगीरे आणि विद्युत विभागाचे सह शहर अभियंता जी.व्ही.राव यांनी प्रगणक गटांच्या प्रत्यक्ष सीमांकनाची कार्यवाही कशी करावी, याबाबत उपस्थितांना जी.आय.एस. नकाशाद्वारे माहिती दिली. दरम्यान, या कामासाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष जाऊन २0 नोव्हेंबरपर्यंत जी.आय.एस. नकाशावर प्रगणक गटाच्या सीमांकनाची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त जऱ्हाड यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)
जी.आय.एस. प्रणालीचे अधिका-यांना प्रशिक्षण
By admin | Published: November 18, 2014 1:54 AM