Join us

RSS च्या धारावीतील कामाचे पुरावे आम्ही दिले, आता तुमची पाळी; भाजपा नेत्याचं सरकार, पालिकेला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 5:45 PM

धारावीतील कोरोना नियंत्रणाचं श्रेय हे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य सेवाभावी संस्थांचे असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीनं कोरोनावर नियंत्रण मिळवता येतं, याची उदाहरण जगासमोर ठेवलं.  जागतिक आरोग्य संघटनेनं ( WHO) याचे कौतुक केलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतुक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली. पण, आता त्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. 

WHOचे महासंचालक म्हणाले की, 'जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे. मुंबईतील  झोपडपट्टी परिसरातील लोकांची चाचणी, ट्रेसिंग, सामाजिक अंतर आणि संक्रमित रुग्णांवर त्वरित उपचार करण्याच्या पद्धतीमुळे धारावी कोरोनावर विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे.'' डब्ल्यूएचओ महासंचालकांनी धारावी मॉडेलचं कौतुक करताना नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता यावर जोर दिला.

धारावीतील कोरोना नियंत्रणाचं श्रेय हे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य सेवाभावी संस्थांचे असल्याचा दावा भाजपा नेते नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी हेच मत मांडले. आता नितेश राणेनं पालिकेनं काय काम केलं, असा सवाल करताना पुरावे मागितले आहेत. नितेश राणेनं ट्विट केलं की,''राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं धारावीत घराघरात जाऊन कशा पद्धतीनं काम केलं, याचे अनेक पुरावे आम्ही दिले आहेत. आता मुंबई महानगर पालिकेनं काय केलं, याचा एक तरी पुरावा द्यावा. जागतिक आरोग्य संघटना पाहतेय!''   

अन्य मह्त्त्वाच्या बातम्या

अमिताभ बच्चन यांना दहशतवादी देशातून शुभेच्छा नकोत; नेटकऱ्याच्या ट्विटला शोएब अख्तरनं दिलं उत्तर!

भारतीय फलंदाजाच्या घरी हलला पाळणा; झाला मुलीचा बाप! 

इंग्लंडच्या जेम्स अँडरसनकडून मोठी चूक; आयसीसी करणार कारवाई? 

विंडीजनं इंग्लंडला नमवलं; यजमानांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

अमिताभ, अभिषेक बच्चन यांना झाला कोरोना; शाहिद आफ्रिदीनं केलं ट्विट, म्हणाला...

विंडीजच्या विजयानंतर ICC World Test Championship गुणतालिकेत झाले फेरबदल

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मुलगा येणार अडचणीत; 'त्या' व्हिडीओनंतर पोलीस करणार तपास!

अफगाणिस्तानच्या रशीद खानची होतेय 'दबंग' सलमानशी तुलना; कारण जाणून थक्कच व्हाल

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनीतेश राणे धारावी