मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ असताना सरकार केवळ तोंडदेखल्या उपाययोजना करीत असल्याचा आरोप करत दुष्काळग्रस्तांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये आणि फळबागांना १ लाख रूपयांचे अनुदान देण्यात यावे, जुने पीककर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.राज्यातील दुष्काळ, लोकसभा निवडणुकीचा आढावा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी टिळक भवन येथे प्रमुख काँग्रेस नेत्यांची शुक्रवारी बैठक झाली.बैठकीनंतर चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लोकसभा निवडणुकीदरम्यान सरकारने दुष्काळग्रस्तांना अक्षरश: वाऱ्यावर सोडले. सरकारने जलयुक्त शिवारचा प्रचंड गाजावाजा केला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचे आणि ९ हजार गावे दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे जाहीर केले होते. मग तरीही राज्यात एवढा भीषण दुष्काळ कसा पडला, असा सवालही चव्हाण यांनी केला.काँग्रेसने केल्या या मागण्यापुढील हंगामासाठी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करावी, खरीप हंगामासाठी शेतकºयांना बियाणे, खतांची मदत करावी, यापूर्वी सरकारने जाहीर केलेली सर्व नुकसान भरपाई आणि अनुदान तातडीने शेतकºयांच्या खात्यात जमा करावे, सर्व कृषीपंपांचे थकीत बील माफ करावे, चारा छावणीत एका शेतकºयाची कमाल पाच जनावरे घेण्याची अट रद्द करावी आणि दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कासह सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क तातडीने माफ करावे, अशा मागण्या काँग्रेसकडून करण्यात आल्या आहेत.
दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या - काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 5:37 AM