मुंबई : प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णत: आॅनलाइन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, पण निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य महाविद्यालय मिळणे कठीण वाटत असल्याने, ‘आॅनलाइन’ला ‘आॅफलाइन’चाही पर्याय देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.आॅनलाइन प्रक्रियेत ३५ महाविद्यालये निवडतानाच विद्यार्थी आणि पालकांच्या नाकी नऊ येत होते. आता ५० महाविद्यालये निवडण्याची सक्ती करण्यात आली आहे. शिवाय, आॅफलाइन पद्धत पूर्ण बंद केल्यामुळे निवड स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे. आॅनलाइन प्रवेश घेणारे विद्यार्थी अनेकदा पर्याय भरण्याची सक्ती असल्यामुळे नको असलेली महाविद्यालयेसुद्धा निवडतात. अनेकदा नको असलेले महाविद्यालय मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची निराशा होते. अशा वेळी आॅफलाइन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना पाहिजे त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे सोपे जात होते. (प्रतिनिधी)
‘अकरावी प्रवेशासाठी आॅफलाइनचा पर्याय द्या’
By admin | Published: April 21, 2016 3:02 AM