‘त्या’ झोपडीवासीयांना पर्यायी घरे द्या, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 07:29 AM2022-09-27T07:29:27+5:302022-09-27T07:30:43+5:30
विलेपार्ले पश्चिम येथील मिठीबाई कॉलेज लगतच्या नाल्याजवळील इंदिरानगर येथे रविवारी रात्री १० झोपड्या असलेली दोन मजल्यांची बांधकामे कोसळली
मुंबई : नुकसानग्रस्त होऊन कोसळलेल्या विलेपार्ले येथील १० झोपडपट्ट्यांच्या बदल्यात पर्यायी घरे के पश्चिम विभागातच महापालिकेने उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी दिले.
विलेपार्ले पश्चिम येथील मिठीबाई कॉलेज लगतच्या नाल्याजवळील इंदिरानगर येथे रविवारी रात्री १० झोपड्या असलेली दोन मजल्यांची बांधकामे कोसळली. येथे भेट दिली तेव्हा लोढा बोलत होते. ते म्हणाले, १० बांधकामे कोसळून २० लाख रुपयांची वित्तहानी झाली आहे. तसेच १४ घरांना तडे गेले आहेत. नाल्यालगतच्या उर्वरित झोपड्यांच्या लगतच्या भिंत मजबूत करण्याचे काम घनकचरा व्यवस्थापन कार्यालयामार्फत सुरू करण्याबाबत बैठक घेऊन के पश्चिम विभाग कार्यालयाने बैठक घ्यावी.
दरम्यान, आमदार पराग अळवणी, आमदार अमित साटम, नगरसेवक सुनीता राजेश मेहता, उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी पश्चिम उपनगर उपविभागीय अधिकारी सुनील माळी, तहसीलदार अंधेरी सचिन भालेराव, के पश्चिमचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.