वडापावची गाडी परत द्या, म्हणत मंत्रालयात जाळीवर उडी! महापालिकेने वर्षभरापूर्वी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 05:51 AM2024-03-19T05:51:38+5:302024-03-19T05:52:00+5:30
गाडी सोडवण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही दाद मिळत नसल्याने अखेर हा मार्ग स्वीकारल्याची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आपल्या वडापावच्या गाडीवर कारवाई झाल्याने संतप्त झालेल्या मुंबईतील एका रहिवाशाने मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर लावलेल्या जाळीवर उडी मारत आंदोलन केले. ॲडविन बंगेरा असे या व्यक्तीचे नाव असून तो बोरीवलीचा रहिवासी आहे. महापालिकेने एका वर्षापूर्वी त्यांच्या वडापावच्या गाडीवर कारवाई करून ती ताब्यात घेतली आहे. तेव्हापासून ही गाडी सोडवण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले; पण दाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी हा मार्ग स्वीकारला. मंत्रालयात तैनात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केले. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
यापूर्वीही अनेकांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारून आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. जाळीवर उडी मारता येऊ नये म्हणून सर्व मजल्यांवर संरक्षक तारा बसवण्यात आल्या आहेत; पण तरीही हा प्रकार घडल्याने ही उपाययोजना अपुरी असल्याचे समोर आले आहे.