शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना ‘दुधा’चा पोषण आहार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:33 AM2018-05-18T05:33:28+5:302018-05-18T05:33:28+5:30
सध्या महाराष्ट्रात दूध दरवाढ आंदोलन सुरू असून अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी मुळात दुधाला मागणी वाढायला हवी.
- सीमा महांगडे
मुंबई : सध्या महाराष्ट्रात दूध दरवाढ आंदोलन सुरू असून अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी मुळात दुधाला मागणी वाढायला हवी. दुधाला मागणी वाढण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांमध्ये व अंगणवाडीत पुन्हा एकदा दूध पोषण आहार म्हणून सुरू करण्याची गरज शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शाळा व अंगणवाडीतील सकस पोषण आहार, दूध दरवाढीचा प्रश्न आणि शिक्षकांना पोषण आहाराच्या अतिरिक्त कामास जुंपण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न एकाच वेळी सोडवता येतील असे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
शालेय पोषण आहाराच्या अतिरिक्त कामाने व तणावाने शिक्षक व अंगणवाडी सेविका कंटाळल्या आहेत. या जबाबदारीने ते तणावात असतात. शाळांची यातून पूर्ण सुटका करावी अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.
>सहज तोडगा निघू शकेल
शाळा व अंगणवाड्यांना रोज २५० ग्रॅम दूध दिले तरी रोज ६९ लाख लिटर दुधाची मागणी वाढेल. गरोदर महिला व त्यांचे पोषणही आहे. त्यांना २५० गॅ्रम दुध दिले तरी दुधाची मागणी वाढेल व शेतकऱ्यांच्या दुधाच्या प्रश्नावर सहज तोडगा निघू शकेल.
- अजित नवले,
सरचिटणीस, राज्य किसान सभा