रेल्वे अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार द्या - हायकोर्ट
By admin | Published: March 28, 2015 12:38 AM2015-03-28T00:38:19+5:302015-03-28T00:38:19+5:30
रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना विनाविलंब उपचार द्यावेत, असे फर्मान राज्य शासनाने सर्व खाजगी व सरकारी रूग्णालयांना जारी करावे, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिले.
मुंबई: रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना विनाविलंब उपचार द्यावेत, असे फर्मान राज्य शासनाने सर्व खाजगी व सरकारी रूग्णालयांना जारी करावे, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिले.
गेल्या महिन्यात बदलापूर ते अंबरनाथ रेल्वे प्रवासादरम्यान दर्शना पवार ही तरूणी रेल्वेतून पडली. मात्र तिला ढकलण्यात आल्याचा तरूणीच्या कुटुंबियांचा आरोप आहे. घटनेनंतर दर्शनाला तेथील खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र आम्ही रेल्वे अपघातातील पीडितांवर उपचार करत नसल्याचे त्या रुग्णालयाने सांगितले. त्यानंतर तिला एका शासकीय रुग्णालयात व त्यापाठोपाठ सायन, केईएममध्ये नेण्यात आले. यात नऊ तासांचा कालावधी गेला व दर्शनाचा दुर्देवी अंत झाला. ही बाब शुक्रवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आली. त्यावर न्या. व्ही. एम. कानडे व न्या. ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. असे प्रकार होणे ही गंभीर बाब असून यावर शासनाने तोडगा काढावा, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
याबाबतची जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीत वरील घटना न्यायालयासमोर मांडण्यात आली