मुंबईच्या नाल्यांमधील किती गाळ काढला याची माहिती द्या; संजय निरुपम यांचे पालिका आयुक्तांना पत्र
By मनोहर कुंभेजकर | Published: June 22, 2023 05:14 PM2023-06-22T17:14:51+5:302023-06-22T18:09:42+5:30
मुंबई महापालिकेने मुंबईतील नाल्यातील किती गाळ काढला, गाळ काढण्यासाठी किती ट्रक वापरण्यात आले.
मुंबई : पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी मुंबई महापालिकमार्फत मुंबईतील २४ विभागांमध्ये नालेसफाई केली जाते. महापालिकेने यावर्षी २२६ कोटी खर्च करुन नाल्यांची साफसफाई केल्याचे जाहीर केले आहे. यासह नात्यांमधून नऊ लाख मेट्रिक टन गाळ काढण्यात आल्याचा दावाही महापालिकेने केला आहे. मात्र माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत नात्यांची साफसफाई पूर्णपणे झालेली नाही. मी स्वतः पाहणी केली नाले तुडुंब भरलेले आहेत. यामुळे महापालिकेने आतापर्यंत किती गाळ काढला याबाबत माहिती द्यावी, असे पत्र माजी खासदार व काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.
मुंबई महापालिकेने मुंबईतील नाल्यातील किती गाळ काढला, गाळ काढण्यासाठी किती ट्रक वापरण्यात आले आणि त्याकरिता किती खर्च झाल. प्रत्येक ट्रकच्या प्रवाशाची रोजनिशी नोंद आणि प्रत्येक ट्रकचे व्हेईकल ट्रैकिंग सिस्टीमचा अहवाल. मुंबईतील नाल्यातील काढलेला गाळ ज्या ठिकाणी साठवला आहे. त्या जागेचे नाव, स्थान, त्याठिकाणी असलेल्या पालिका, नगर पालिका किंवा ग्रामपंचायत यांची परवानरगी घेण्यात आली की नाही याची माहिती मुंबईकरांना समजली पाहिजे, असे निरुपम यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.