CoronaVirus News in Dharavi: ‘मृत अधिकाऱ्याच्या पत्नीला नोकरी द्या’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 01:09 AM2020-05-01T01:09:26+5:302020-05-01T01:09:44+5:30
या अधिका-याच्या पत्नीला पालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेनी केली आहे.
मुंबई : धारावी येथे अन्नधान्य वाटपाचे काम करणाºया जी उत्तर विभागातील एका अधिका-याचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. या अधिका-याच्या पत्नीला पालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेनी केली आहे़ तसेच पालिकेचा निष्काळजीपणा त्यांच्या जीवावर बेतला, असा आरोप कामगार संघटनांनी केला होता. तसेच करनिर्धारण व संकलन खात्यातील अधिकाऱ्यांनी एक दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र कोरोनाविरुध्द सुरू असलेल्या मोहिमेत सहभागी सर्व कर्मचाºयांच्या चाचणीचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्यामुळे हा बहिष्कार मागे घेण्यात आल्याचे कामगार संघटनांनी सांगितले. धारावी परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तिथे प्रतिबंधित क्षेत्रही अधिक आहेत. या बाधित क्षेत्रांमध्ये अन्नधान्य वाटपाचे काम करण्याची जबाबदारी जी उत्तर विभागातील करनिर्धारण व संकलन विभागाच्या एका विभाग निरीक्षकावर होती.
मात्र त्यांचा बुधवारी एका खासगी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांची चाचणी वेळेत न करण्यात आल्यामुळे कोरोनाची लागण त्यांना झाली, असा आरोप मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेने केला आहे.
या निष्काळजीच्या निषेधार्थ जी उत्तर विभागातील अधिकाºयांनी गुरुवारी कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र सहआयुक्त सुनील धामणे यांच्याबरोबर पालिका संघटनेच्या पदाधिकाºयांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत सदर मृत अधिकाºयाच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम व त्यांच्या पत्नीला पालिकेमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे कळते़ कर्मचाºयांच्या आरोग्य तपासणीचेही आश्वासन देण्यात आले आहे.
>बहिष्कार मागे घेण्यात आल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रकाश देविदास यांनी दिली. मात्र याबाबत सहआयुक्त धामणे यांच्याशी संपर्क झाला नाही़