महाराष्ट्रातही आता धर्मांतर बंदी कायदा आणून महिलांना न्याय द्या; नितेश राणेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 08:41 PM2022-07-21T20:41:15+5:302022-07-21T20:41:48+5:30

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने १५ दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले आहे.

Give justice to women by bringing Prohibition of Conversion Act in Maharashtra too; BJP MLA Nitesh Rane's demand | महाराष्ट्रातही आता धर्मांतर बंदी कायदा आणून महिलांना न्याय द्या; नितेश राणेंची मागणी

महाराष्ट्रातही आता धर्मांतर बंदी कायदा आणून महिलांना न्याय द्या; नितेश राणेंची मागणी

googlenewsNext

मुंबई- मध्यप्रदेश, गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही आता धर्मांतर बंदी कायदा आणून महिलांना न्याय द्या, अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. 

आपण भोळ्या महिलांना यामध्ये अडकण्यापासून आणि त्यामधून होणाऱ्या छळपासून वाचलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. तसेच लवकरच हा कायदा आणूयात, असं म्हणत जय श्रीराम, असं नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने १५ दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले आहे. यामध्ये आरे मधील कारशेडपासून नामांतरणांपर्यंत अनेक निर्णय घेण्यात आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही शिवसेनेतून बाहेर पडल्याचं शिंदे गटाकडून वारंवार सांगितलं जात आहे. याचदरम्यान, नितेश राणेंनी  धर्मांतर बंदी कायदा आणण्याची मागणी केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Give justice to women by bringing Prohibition of Conversion Act in Maharashtra too; BJP MLA Nitesh Rane's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.