मुंबई - मुंबई सेंट्रल स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ मुंबईत घालवला आहे. त्यामुळे येथील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचे नाव दिले पाहिजे, असेही आठवलेंनी स्पष्ट केलं.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवेंनी मुंबई सेंट्रल स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी केली. तसेच लवकरच मी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, दादर स्थानकाचंही नामकरण चैत्यभूमी स्थानक असे करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.