ठळक मुद्देभाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आरोप केला की, महाविकास आघाडी सरकारने २०२१-२२ साठी या महामंडळाला फक्त साडेबारा कोटी रु. देण्याचे जाहीर केले आहे.
मुंबई : मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला राज्य शासनाने तातडीने १०० कोटींचे अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी या महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आरोप केला की, महाविकास आघाडी सरकारने २०२१-२२ साठी या महामंडळाला फक्त साडेबारा कोटी रु. देण्याचे जाहीर केले आहे. पण सरकारने सत्तेत आल्यानंतर या महामंडळाला ५० कोटी रु. देण्याचे जाहीर केले केले होते.