रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्या, मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 07:24 AM2021-04-17T07:24:21+5:302021-04-17T07:24:43+5:30

Uddhav Thackeray : बाधित रुग्णांना बेड मिळण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेबरोबरच अतिरिक्त बेडच्या उपलब्धतेवर भर द्यावा. त्याचप्रमाणे प्राणवायू (ऑक्सिजन) आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी उत्पादक अथवा पुरवठादारांशी समन्वय साधावा, असे ठाकरे यांनी सांगितले.

Give patient test report early, CM reviews corona situation in Mumbai | रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्या, मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा

रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्या, मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा

Next

मुंबई : मुंबईतील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांकडून रुग्णांचे चाचणी अहवाल कमी वेळेत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ते नियोजन करा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले.
महापालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा ठाकरे यांनी ऑनलाइन बैठकीत घेतला. बाधित रुग्णांना बेड मिळण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेबरोबरच अतिरिक्त बेडच्या उपलब्धतेवर भर द्यावा. त्याचप्रमाणे प्राणवायू (ऑक्सिजन) आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी उत्पादक अथवा पुरवठादारांशी समन्वय साधावा, असे ठाकरे यांनी सांगितले.
इक्बालसिंह चहल म्हणाले की, मुंबईमध्ये साधारणत: १० फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. असे असले तरी दैनंदिन रुग्णांमध्ये सुमारे ८५ टक्के हे लक्षणे नसलेले बाधित रुग्ण आहेत.
मुंबईतील प्रत्येकी ४ विभागांमागे एक याप्रमाणे एकूण २४ प्रशासकीय विभागांसाठी ६ प्राणवायू पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत, जे तातडीच्या स्थितीत प्राणवायू उपलब्ध करून देऊ शकतील. 
कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने अँटिजन टेस्ट करावी. त्यात बाधित आढळले, तर त्यांचे विलगीकरण करून, आरटीपीसीआर चाचणी करावी, जेणेकरून बाधित रुग्ण वेळीच शोधता येतील व आरटीपीसीआर चाचण्यांवरील ताणही कमी होईल, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी केली.यावेळी मुख्य सचिव कुंटे यांनी येत्या काळात अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

-कोरोना चाचणीचा अहवाल २४ तासांच्या आत देण्याच्या सूचना सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.
-रेमडेसिविर इंजेक्शनसह इतर औषधांची कमतरता भासणार नाही, याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे सांगून चहल म्हणाले की, रेमडेसिविर इंजेक्शनच्या २ लाख मात्रा खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यातील २५ हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. 

Web Title: Give patient test report early, CM reviews corona situation in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.