Join us

महिला सुरक्षेसाठी एकच हेल्पलाइन क्रमांक द्या, पीयूष गोयल यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 3:57 AM

उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे हेल्पलाइन क्रमांक वेगवेगळे आहेत, तरी प्रवाशांना सोयीस्कर ठरेल, असा एकच हेल्पलाइन क्रमांक तयार करा, अशा सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. माटुंगा स्थानकाच्या पाहणी दौºयादरम्यान रविवारी ते बोलत होते.

मुंबई : उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे हेल्पलाइन क्रमांक वेगवेगळे आहेत, तरी प्रवाशांना सोयीस्कर ठरेल, असा एकच हेल्पलाइन क्रमांक तयार करा, अशा सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. माटुंगा स्थानकाच्या पाहणी दौºयादरम्यान रविवारी ते बोलत होते.या वेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, गोयल म्हणाले की, देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये मानवी तस्करांच्या घटनेत वाढ होत आहे.मुंबईसारख्या ठिकाणीही ‘टर्मिनस’ येथून मानवी तस्करी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही तस्करी रोखण्यासाठी ‘भारतीय रेल्वे’ विशेष उपाययोजना आखणार आहे. प्रवासी सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांच्यावर आहे. सद्य:स्थितीत दोन्ही सुरक्षा यंत्रणेचे स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक आहेत. दोन वेगवेगळ्या क्रमांकांपेक्षा एकच हेल्पलाइन क्रमांक ठेवणे योग्य असेल, तसेच सीसीटीव्हींचे फुटेज, निरीक्षण दोन्ही यंत्रणेला मिळावे, अशी व्यवस्था करण्याची गरज गोयल यांनी व्यक्त केली.आगामी अर्थसंकल्पांमध्ये रेल्वेच्या नवीन प्रकल्पांपेक्षा अस्तित्वात असलेले प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. रेल्वे स्थानक विकास प्रकल्पांसाठी जनतेने हरकती आणि सूचना द्याव्यात. योग्य त्या सूचना प्रत्यक्षात उतरविण्यात येतील. यंदाचा अर्थसंकल्प हा रेल्वेसाठी ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.माटुंग्यातून महिला सशक्तीकरणाचा नारा-माटुंगा स्थानकातून देशाला महिला सशक्तीकरणाचा नारा मिळत आहे. या स्थानकातून महिलांच्या सामर्थ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. महिलांना जबाबदारी दिली असता, त्या योग्य पद्धतीने आणि यशस्वीपणे पार पाडतात, असे उद्गार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी माटुंगा स्थानकाबाबत काढले.जलद मंजुरीसाठी ‘रस्ते-रेल्वे’ एकत्र-केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत रेल्वे प्रकल्प आणि राष्ट्रीय महामार्ग यांमधील प्रकल्पांची चर्चा झाली. यात राष्ट्रीय महामार्गावरून उन्नत रेल्वे स्थानक प्रकल्प अथवा रेल्वे स्थानकावरून उन्नत महामार्ग अशा प्रकल्पांना तातडीने मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

टॅग्स :पीयुष गोयलमुंबई