Join us

उड्डाणपुलाखालील जागा ‘पिकलबॉल’साठी द्या; गोपाळ शेट्टी यांचे पालिका आयुक्तांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 11:35 AM

शहरातील  उड्डाणपुलाखाली खूप जागा मोकळ्या आहेत.

मुंबई : शहरातील  उड्डाणपुलाखाली खूप जागा मोकळ्या आहेत. तिथे भंगार गोळा करणारे आणि इतर बेवारस लोक जागेचा दुरुपयोग करीत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा त्रास होतो.

हा त्रास दूर करण्यासाठी आणि पिकलबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व उड्डाणपुलाखाली  विशेष परवानगी लवकरात लवकर उपलब्ध देण्यात यावी. आपण संबंधित उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना निर्देश द्यावेत, अशी मागणी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंग चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

२९ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष  अरविंद प्रभू यांनी  खासदरा शेट्टी यांना  मुंबई महापालिकेच्या आणि खासगी भूखंडांवर अशा खेळाला परवानगी दिल्यास खूप मोठ्या प्रमाणात लोक या खेळाचा लाभ घेतील आणि विशेष करून तरुणांना हा खेळ खूप लाभदायक आहे. त्यामुळे खासदार या नात्याने आपण या संदर्भात पाठपुरावा करावा अशी विनंती पत्राद्वारे केली होती.

खेळ कमी खर्चाचा

  या खेळाचे आयोजन कमी जागेत आणि कमी खर्चाचा आहे.

  हा खेळ शारीरिक फिटनेस राखण्यास खूपच लाभदायक आहे, असे अनेक जाणकारांचे मत आहे.

  हा खेळ पाहिल्यानंतर  नेस्को सारख्या कमर्शिअल जागेत या खेळाचे आयोजन होत असल्यामुळे तरुण, मध्यम वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक या खेळात सहभागी होऊ शकत नाही.

  त्यामुळे उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागेत या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी संबंधीतांना आदेश द्यावेत, असे  खासदार शेट्टी यांनी पत्रात म्हटले आहे.

  या पत्राचा संदर्भ घेत त्यांनी महापालिका आयुक्तांना  पत्र पाठवून पिकलबॉल खेळाच्या जागेची मागणी केली आहे.