मुंबई : शिवडी कॉटन ग्रीन भागातील हाजी बंदर रोड , फॉसबेरी रोड आणि मेसेन्ट रोड हे रस्ते मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे.
शिवडी कॉटन ग्रीन भागातील प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवडी पूर्वेकडील पट्टा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत आहे. या ठिकाणी सुमारे ४० हजार लोक राहतात आणि १० हजार घरे आहेत. या परिसरात हाजी बंदर रोड , फॉसबेरी रोड आणि मेसेन्ट रोड हे अटल सेतूला जाण्यासाठीचे आहेत. या मार्गाने दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा सुरु असते. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणवर खड्डे आहेत. दिवाबत्तीची व्यवस्था , स्वच्छता आदीची वानवा आहे. ज्या प्रकारे मेसेन्ट रोड वरील ईस्टर्न फ्रीवे पालिकेकडे हस्तांतरित झाला त्याच धर्तीवर अन्य रस्तेही करावेत, असे त्यांनी पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पात्रात नमूद करण्यात आले आहे.
अटल सेतूला लागून असलेले रस्ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात आहेत. मात्र त्यांची व्यवस्थित देखभाल होत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.