‘नव्या पिढीला मार्गदर्शनासाठी वेळ द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:19 AM2017-08-03T02:19:31+5:302017-08-03T02:19:31+5:30
यशाचे शिखर गाठणारी तरुणपिढी निर्माण होण्यासाठी या वाटेवरून प्रवास केलेल्या सर्वांनीच या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी वेळ द्यायला हवा, असे भावनिक आवाहन
मुंबई : यशाचे शिखर गाठणारी तरुणपिढी निर्माण होण्यासाठी या वाटेवरून प्रवास केलेल्या सर्वांनीच या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी वेळ द्यायला हवा, असे भावनिक आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण, डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले आहे. ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशना वेळी ते बोलत होते.
राज्याचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवणाºया उद्योग, शिक्षण, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतल्या ३३ प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वांची यशोगाथा सांगणाºया ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा पुस्तक प्रकाशन सोहळा रंगला. सोहळ््याच्या सुरुवातीला मराठी अभिमान गीत आणि पुस्तकातील ३३ मान्यवरांचा परिचय करणारी ध्वनिचित्रफिती दाखविण्यात आली. तसेच लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला अभिवादन करत पगडी, पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी ग्रंथालीचे विश्वस्त धनंजय गांगल यांनी ४० वर्षांपासून वाचनसंस्कृती घडवणाºया, चळवळ उभ्या करणाºया ‘ग्रंथाली’चा प्रवास मांडला. लेखक आनंद आणि सुनीता गानू यांनी गर्जे मराठीतील मान्यवरांना शब्दबद्ध करण्याचा अनुभव विशद केला. ‘गर्जे मराठी’ हे पुस्तक ग्रंथालीचे मार्गदर्शक एकनाथ ठाकूर यांना अर्पण करण्यात आले.
ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल, अनुराधा ठाकूर आणि आनंद लिमये यांचा सत्कार समारंभ या वेळी डॉ. माशेलकरांच्या हस्ते पार पडला. डॉ. दिनेश केसकर, डॉ. विजय जोशी, डॉ. अजय राणे, अरुण जोशी, डॉ. मंदार बिच्चू, हर्षवर्धन भावे, रवींद्र नेने, नंदिनी नेने, अमित वायकर, नंदकुमार ढेकणे आणि प्रशांत खरवडकर यांनीही या कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.